
मेलबर्न : भारताच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाची निवड शुक्रवारी करण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या या संघामध्ये भारतीय वंशाच्या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. यामध्ये यश देशमुख व आर्यन शर्मा या दोन खेळाडूंचा समावेश आहे.