INDW vs ENGW : भारतीय महिलांनी रचला इतिहास! यजमान इंग्लंडचा पराभव करत गाठली फायनल

Indian Women Cricket Team Defeat England Women In Commonwealth Games 2022 T20 Cricket Semi Final Secure Silver Medal
Indian Women Cricket Team Defeat England Women In Commonwealth Games 2022 T20 Cricket Semi Final Secure Silver Medalesakal

Commonwealth Games 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघाने (India Women's Cricket Team) बर्मिंगहम येथे सुरू असेलल्या राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला. त्यांनी यजमान इंग्लंडचा 4 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. त्यात भारतीय संघाने फायनल गाठून इतिहास रचला. भारतीय संघाने रौप्य पदक (Silver Medal) निश्चित केले असले तरी त्यांच्याकडून आता सुवर्णाची अपेक्षा असणार आहे.

भारताने इंग्लंडसमोर 165 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र इंग्लंडला 20 षटकात 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून स्मृती मानधना दमदार खेळी करत 32 चेंडूत 61 धावा केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्जने 44 धावांची झुंजार खेळी करत भारताला 20 षटकात 164 धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर गोलंदाजीत दिप्ती शर्माने 1 तर स्नेह राणाने 2 विकेट घेतल्या. भारतीय क्षेत्ररक्षकांनी तीन फलंदाज धावबाद करत विजयात आपला मोलाचा वाटा उचलला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी धडाकेबाज सुरूवात करत 8 व्या षटकात 76 धावांपर्यंत मजल मारली. यात स्मृती मानधानाच्या धडाकेबाज 61 धावांचा वाटा मोठा होता. मात्र दमदार सुरूवात करून दिल्यानंतर स्मृती मानधना 61 तर शेफाली 15 धावांची भर घालून माघारी परतल्या.

त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्जने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूनचे तिला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौर 20 चेंडूत 20 धावा करत माघारी गेली. त्यानंतर जेमिमाहने दिप्ती शर्मा (20 चेंडूत 22 धावा) सोबत 53 धावांची भागिदारी रचली. रॉड्रिग्जने 31 चेंडूत नाबाद 44 धावांची खेळी करत भारताला 20 षटकात 5 बाद 164 धावांपर्यंत पोहचवले.

भारताचे विजयासाठीचे 165 धावांचे आव्हान घेवून मैदानात उतलेल्या इंग्लंडला ठराविक अंतराने धक्के देत त्यांच्या धावगतीला ब्रेक लावला. इंग्लंडकडून कर्णधार नतालिया सिव्हरने 41 धावांचा झुंजार खेळी केली. तिला एमी जोनसने 24 चेंडूत 31 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. मात्र अखेरच्या षटकातपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. याचबरोबर भारतीय क्षेत्ररक्षकांनीही चांगली कामगिरी करत नतालिया आणि एमी सह तीन फलंदाजांना धावबाद केले. शेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी 14 धावांची गरज असताना स्नेह राणाने फक्त 9 धावा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com