
Women's Cricket : लक्ष्मणच्या खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी; रमेश पोवारचं काय?
भारतीय वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचे (Indian Women's Cricket Team) न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर आता संघाचे प्रशिक्षक (Coach) रमेश पोवार (Ramesh Powar) याचा कार्यकाळ देखील संपला. बीसीसीआयच्या (BCCI) नियमांनुसार आता त्याला पुन्हा या पदासाठी अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हीव्हीएस लक्ष्मणला (VVS Laxman) महिला क्रिकेट संघाच्या बाबतीत एक मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: दुबे नाही तर 'हे' आहे CSK च्या पराभवाचे कारण; कर्णधाराचा खुलासा
वर्ल्डकपमध्ये भारताची झालेली निराशाजनक कामगिरी पाहता महिल्या क्रिकेट संघात आणि मॅनेजमेंटमध्ये काही अमुलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत नव्या दमाचे क्रिकेटपटू घडवण्याचे काम करणाऱ्या लक्ष्मणवर महिला क्रिकेट संघाबाबतही मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: IPL 2022 : कैफने केकेआरवर कुलदीपच्या खच्चीकरणावरून केले गंभीर आरोप
रमेश पोवारने डब्लू व्ही रमन यांच्याकडून 2020 मध्ये महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहचवले होते. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पोवारचा करार वर्ल्डकप पर्यंतच होता. करार वाढवण्यासंदर्भात कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे आता सर्व प्रक्रिया पुन्हा अर्ज करणे आणि मुलाखती घेणे यापासून सुरू होणार आहे. पोवार नक्कीच पुन्हा अर्ज करू शकतात. यावर सीएसी ( क्रिकेट सल्लागार समिती) संविधानानुसार यावर निर्णय घेईल.
हेही वाचा: शुटिंग ते थेट स्टेडियम; धनश्रीनं व्हिडिओतून सांगितली स्टोरी
भारतीय महिला क्रिकेट संघाने चांगली कामगिरी केली असतानाही रमन यांना दुसरा कार्यकाळ देण्यात आला नव्हता. त्यावेळी रमेश पोवार यांना पुन्हा आणण्यात आले होते. कर्णधार मिताली राज आणि रमेश पोवार यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. याबाबत सूत्रांनी सांगितले की, 'सीएसी याबाबत निर्णय घेते. जर त्यांना वाटले की रमेश रमनपेक्षा चांगला आहे तर हा त्यांचा निर्णय असेल. यात क्रिकेट बोर्ड हस्तक्षेप करू शकत नाही.'
Web Title: Indian Womens Cricket Team Coach Ramesh Powar Contract Finish Vvs Laxman May Get Bigger Role
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..