'द हंड्रेड'मध्ये स्मृतीचा धमाका; तिचा सिक्सर पाहाच (VIDEO)

तिच्या धमाकेदार खेळीमुळे 84 चेंडूतच संघाने नोंदवला विजय
Smriti-Mandhana
Smriti-MandhanaTwitter

Smriti Mandhana First Sixer in the hundred : इंग्‍लंडमध्ये द हंड्रेड लीगचा शुभारंभ झालाय. या स्पर्धेतील पहिल्या हंगामात मंगळवारी भारतीय महिला संघाची स्फोटक फलंदाज स्‍मृती मानधनाचा धमाका पाहायला मिळाला. कार्डिफच्या सोफिया गार्डनच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात स्‍मृती मानधनाने 39 चेंडूत 61 धावांची दमदार खेळी केली. स्‍मृती मानधनाने (Smriti Mandhana) धोनी स्टाइल फिनिशिंग करत सिक्सर खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याचे पाहायला मिळाले. आपल्या डावात तिने 5 चौकार आणि तीन षटकार खेचले. (indian womens cricketer smriti mandhana hit fifty in the hundred league in match watch Six)

The Hundred League स्पर्धेत स्मृती मानधना साउथर्न ब्रेन वूमन्स संघाचे प्रतिनिधीत्व करते. मंगळवारी विलश फायर वूमन्स विरुद्धच्या सामन्यात स्मृतीने धमाका केला. या स्पर्धेत तिने मारलेला पहिला षटकार डोळ्याचे पारणे फेडणारा असा होता. तिने खेचलेल्या उत्तुंग षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

Smriti-Mandhana
Olympics Day 6 : दीपिकाचा 'अचूक वेध', पदकाच्या दृष्टिक्षेपात

इंग्‍लंड आणि वेल्‍स क्रिकेट बोर्डाने द हंड्रेड लीग स्पर्धेचे आयोजन केले आहे. या लीगमधील मॅचमध्ये एका इनिंगमध्ये 100 चेंडू फेकले जातात. वेल्‍श फायर संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करताना 100 चेंडूत सात विकेटच्या मोबदल्यात 110 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि डेनियल वॉट जोडीने आपल्या संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. डेनियल वॉट बाद झाल्यानंतर सोफिया डंकले हिने 16 चेंडूत 16 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने स्‍मृती मानधनाने जलदगतीने धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिने 156 च्या स्‍ट्राइक रेटने धावा करत 84 चेंडूतच संघाला विजय मिळवून दिला.

Smriti-Mandhana
धवन नव्हे भुवीच्या नेतृत्वाखाली मराठमोळा ऋतूराज करणार ओपनिंग?

भारतीय महिला संघ जूनच्या सुरुवातीलाच पुरुष संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. एकमेव कसोटी सामन्यासह वनडे आणि टी-20 मालिकेनंतर भारतीय महिला संघातील खेळाडू द हंड्रेड लीगमध्ये खेळताना दिसत आहेत. जेमिमा रॉड्रिग्ज हिने सलग दोन अर्धशतके झळकावत भारतीय महिला खेळाडू स्पर्धा गाजवण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर स्मृतीच्या भात्यातून फटकेबाजी पाहायला मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com