अंतिम फेरीपासूनही महिला जिम्नॅस्ट दूर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

जागतिक आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेतील एकाही प्रकारात भारतीय महिलांना अंतिम फेरी गाठता आली नाही; त्यामुळे त्यांच्या ऑलिंपिक पात्रतेच्या आशा दुरावल्या आहेत. या स्पर्धेतून तरी त्यांना ऑलिंपिक पात्रता गवसणार नाही.

मुंबई : जागतिक आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेतील एकाही प्रकारात भारतीय महिलांना अंतिम फेरी गाठता आली नाही; त्यामुळे त्यांच्या ऑलिंपिक पात्रतेच्या आशा दुरावल्या आहेत. या स्पर्धेतून तरी त्यांना ऑलिंपिक पात्रता गवसणार नाही.

महिलांच्या सर्वांगीण क्रमवारीत प्रणती नायक 127 वी; तर प्रणती दास 132 वी आली. त्यांनी अनुक्रमे 45.832 आणि 45.248 गुण नोंदवले. अरुणा रेड्डीची कामगिरी लक्षातही घेण्यात आली नाही. व्हॉल्ट प्रकारातील दुसरा प्रयत्न अवैध ठरल्याने ती बाद झाली.

वैयक्तिक प्रकारात भारतीय पहिल्या शंभरमध्ये आले नाहीत. नायक, दास आणि रेड्डी अनुक्रमे 10.566, 9.916 आणि 8.925 गुणांसह 164, 182 आणि 193 व्या क्रमांकावर गेल्या.

बॅलन्स बीममध्ये फार काही वेगळे घडले नाही. दास (10.866 - 138), रेड्डी (10.200 - 164 ) आणि नायकची (9.933 - 174) पीछेहाट सुरूच राहिली. फ्लोअर एक्‍झरसाईजमध्ये हाच कित्ता गिरवला गेला. त्यात दास (11.466 - 151) आणि नायकला (11.133) पहिल्या शंभरपासून दूरच राहावे लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian womens gymnast far away from world championship finals