
India vs Malaysia Womens Hockey : भारतीय ज्युनियर महिला हॉकीपटूंनी आशियाई करंडकात सलग दुसरा विजय नोंदवला. सलामीच्या लढतीत बांगलादेश संघाला १३-१ अशी धूळ चारल्यानंतर भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने मलेशियाच्या ज्युनियर महिला संघाचा ५-० असा धुव्वा उडवला. दीपिका सेहरावत हिने सलग दुसऱ्या सामन्यात हॅट्ट्रिकची नोंद केली. वैष्णवी फाळके व सिचाव कनिका यांनी प्रत्येकी एक गोल केला. आता अ गटातील पुढील लढतीत भारतीय ज्युनियर महिला संघ चीनच्या ज्युनियर संघाशी लढणार असून अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत थायलंडच्या ज्युनियर संघाचा सामना करणार आहे.