Sports News: भारतीय महिला हॉकी संघाचा सप्ततारांकित विजय,आशियाई चॅम्पियन्स करंडक , थायलंडवर ७-०ने मात, आता लढत चीनशी

Women's Asian Champions Trophy: भारतीय महिला हॉकी संघाने थायलंडचा ७-० असा पराभव करत स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला; दीपिकाची शानदार हॅट्ट्रिक.
Indian women's hockey team celebrates its 7-0 victory over Thailand in the Asian Champions Trophy.

Indian women's hockey team celebrates its 7-0 victory over Thailand in the Asian Champions Trophy.

eskal

Updated on: 

भोपाळ: गतविजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखत महिला आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत विजयाची हॅट्‌ट्रिक साजरी केली. रविवारी झालेल्या स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या साखळी सामन्यात यजमान भारताने थायलंडचा ७-० असा धुव्वा उडवला. यापूर्वी भारताने मलेशिया आणि दक्षिण कोरियाला पराभूत केले होते.

Loading content, please wait...