
Indian womens kabaddi team Won Asian Championship जागतिक महिला दिनी भारताच्या संघाने आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद २०२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. मराठमोळ्या सोनाली शिंगटेच्या नेतृत्वात भारताने पाचव्यांदा स्पर्धेतो जेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात भारतीय संघाने यजमान इराणवर ३२-२५ अशा फरकाने मात केली व स्पर्धा जिंकत विजेतेपदाच्या ट्रॉफीवर नाव कोरले. यासाठी भारतीय महिला कबड्डी संघाला मंगळवारी गौरवण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.