
नवी दिल्ली : भारताचा युवा खेळाडू आयुष शेट्टी याने रविवारी मध्यरात्री झालेल्या पुरुष एकेरी गटातील अंतिम फेरीच्या लढतीत कॅनडाच्या ब्रायन यांग याला पराभूत करीत अमेरिकन ओपन सुपर ३०० या स्पर्धेच्या जेतेपदावर मोहर उमटवली. हे त्याचे बीडब्ल्यूएफ जागतिक टूअरचे पहिलेच जेतेपद होय. महिला एकेरी गटामध्ये मात्र भारताच्या तन्वी शर्मा हिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.