ऑलिम्पिकच्या आखाड्यात भारतीय कोचचा राडा; रेफरीलाच हाणलं!

स्पर्धेतून तातडीने हकालपट्टी; अधिस्वीकृतीही रद्द
ऑलिम्पिकच्या आखाड्यात भारतीय कोचचा राडा; रेफरीलाच हाणलं!
ऑलिम्पिकच्या आखाड्यात भारतीय कोचचा राडा; रेफरीलाच हाणलं!sakal

नवी दिल्ली : दीपक पुनियाचे परदेशी मार्गदर्शक मुराद गॅईदारोव यांची ऑलिंपिक क्रीडा नगरीतून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने हकालपट्टी केली आहे. दीपक पुनिया पराजित झाल्यानंतर त्यांनी रेफरींना जोरदार मारहाण केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी त्यांचे स्पर्धा अधिस्वीकृतीही रद्द करण्यात आले. (India's Deepak Punia reacts after losing against MN Amine from San Marino in mens freestyle 86kg bronze medal match)

दीपक सॅन मरीनोच्या माईल नझीम अमीन याच्याविरुद्धच्या ब्राँझ पदकाच्या लढतीत २-१ आघाडीनंतर पराजित झाला. या लढतीत अखेरच्या सेकंदात त्याने आघाडी गमावली होती. दीपकच्या पराभवामुळे चिडलेल्या गॅईदारोव यांनी रेफरी रूममध्ये जाऊन लढतीच्या वेळी असलेल्या पंचांना मारहाण केली.

जागतिक महासंघाने याबाबत लगेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे तक्रार केली. शुक्रवारी याबाबत लगेच सुनावणी झाली आणि त्यात गॅईदारोव यांचे अॅक्रिडिएशन रद्द करण्यात आले, तर भारतीय कुस्ती महासंघास ताकीद देण्यात आली. भारतीय महासंघाने मार्गदर्शकांची तातडीने हकालपट्टी केली आहे, तसेच चुकीबद्दल बिनशर्त माफी मागितल्याने कठोर कारवाई टळली असल्याचे सांगितले जात आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने मार्गदर्शकांच्या गैरकृत्याबाबतचे पत्र भारतास पाठवले. त्यानंतर गॅईदारोव यांना तातडीने भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. गॅईदारोव यांनी २००४ च्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाल्यानंतर प्रतिस्पर्ध्यास मारहाण केली होती.

ऑलिम्पिकच्या आखाड्यात भारतीय कोचचा राडा; रेफरीलाच हाणलं!
जाणून घ्या अदितीनं लक्षवेधी कामगिरी केलेल्या गोल्फ बद्दल

भारतावरील बंदी टळली

मार्गदर्शकांनी मारहाण केल्यास महासंघावर बंदी येऊ शकते. मात्र सुदैवाने यातून भारताची कुस्ती महासंघाची सुटका झाली आहे, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी सांगितले.

भारतीय कुस्ती महासंघ कारवाईतून बचावला

मुराद गॅईदारोव यांनी पंचांना मारहाण केल्यानंतरच्या कारवाईतून भारतीय कुस्ती महासंघ थोडक्यात बचावला आहे, अशी कबुली भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी दिली. गॅईदारोव सोडल्यास ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेतील भारतीय मार्गदर्शकांविरुद्ध कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. त्यांची स्पर्धेतील वागणूक चांगली आहे. आम्ही गॅईदारोव यांना तातडीने बडतर्फ केले आहे, त्यामुळे भारतीय महासंघावरील कारवाई टळली, असे महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी सांगितले. गॅईदारोव यांना भारतातून जाऊन त्यांच्या सर्व गोष्टी तातडीने ताब्यात घेण्यास सांगितले आहे. त्यानंतर लगेचच त्यांना देश सोडण्यास स्पष्टपणे सांगितले आहे, असे तोमर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com