
नवी दिल्ली, ता. २ : भारताकडून २०३६ मधील ऑलिंपिक आयोजनासाठी इच्छा व्यक्त करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेकडे (आयओसी) लिखित स्वरूपामधून मागणीही करण्यात आली आहे. हाच धागा पकडून आयओसीच्या अध्यक्षपदासाठीचे प्रबळ दावेदार असलेले सेबॅस्टियन को याप्रसंगी म्हणाले की, भारताला ऑलिंपिक आयोजनाची उत्तम संधी आहे, मात्र ऑलिंपिक आयोजनाचे हक्क मिळवण्यासाठी इतर देशही सज्ज आहेत. त्यामुळे ऑलिंपिक आयोजनाचा मान मिळवण्याची स्पर्धा तीव्र आहे.