रोहित कॅप्टन झाला रे! न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KL Rahul Rohit And Virat
रोहित कॅप्टन झाला रे! न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाची घोषणा #TeamIndia #RohitSharma #Cricket #CricketNews #KLRahul

रोहित कॅप्टन झाला रे! न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाची घोषणा

विराट कोहलीनंतर भारतीय टी-20 संघाची धूरा रोहित शर्माच्या खांद्यावर आली आहे. बीसीसीआयने न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली लोकेश राहुलला उप कर्णधाराची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. कोहलीने टी-20 संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर रोहित शर्माच संघाच्या कर्णधारपदी विराजमान होईल, अशी चर्चा रंगली होती. अधिकृतरित्या यावर शिक्कामोर्तब झालाय.

हेही वाचा: ICC Award : रातोरात हिरो झालेल्या पाक फलंदाजानं मारली बाजी!

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात विराट कोहलीने रोहितच कर्णधार होणार याचे संकेत दिले होते. बीसीसीआयने न्यूझीलंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा करताच यावर शिक्कामोर्तब झाले. न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. यात ऋतूराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर यासारख्या आयपीएलमध्ये धमाका केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे विराट कोहली. जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी यांना संघात स्थान दिल्याचे दिसत नाही.

हेही वाचा: शास्त्रींचा ड्रेसिंग रुममधील अखेरचा क्षण, व्हिडिओ व्हायरल

India’s T20I squad: रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उप-कर्णधार), ऋतूराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच विराट कोहलीने वर्कलोडचे कारण सांगत टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली होती. त्याच्या या निर्णयानंतर भारतीय संघ वर्ल्ड कपसाठी मैदानात उतरला. विराटच्या नेतृत्वाखालील संघाला वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीतूनच माघारी परतावे लागले. रोहितच्या नेतृत्वाखालील संघासोबत राहुल द्रविड संघाचे नवे कोच असतील. नव्या बदलासह टिम इंडियाचा पुढील प्रवास कसा असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Indias Squad For T20i S Against New Zealand Rohit Sharma Captain And Kl Rahul Vice Captain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketRohit Sharma