Open Badminton Competition : भारताच्या प्रणोय, श्रीकांतचा खेळखल्लास

भारताच्या एच. एस. प्रणोय व किदांबी श्रीकांत या अनुभवी खेळाडूंना इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी निराशेला सामोरे जावे लागले.
pranoy and shrikant
pranoy and shrikantsakal

जकार्ता - भारताच्या एच. एस. प्रणोय व किदांबी श्रीकांत या अनुभवी खेळाडूंना इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी निराशेला सामोरे जावे लागले. प्रतिस्पर्ध्यांकडून झालेल्या पराभवांमुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. लक्ष्य सेन, प्रियांशू राजावत व किरण जॉर्ज यांनी पुरुषांच्या एकेरीत मात्र विजयाला गवसणी घालत पुढे पाऊल टाकले.

लोह किन येव याने सातवा मानांकित एच. एस. प्रणोयवर २१-१८, १९-२१, २१-१० असा तीन गेममध्ये एक तासामध्ये विजय साकारला. पहिल्या गेममध्ये पराभूत झाल्यानंतर प्रणोयने दुसऱ्या गेममध्ये झोकात पुनरागमन केले होते, पण लोह याने तिसरा गेम जिंकून आगेकूच केली. ली झी झिया याने किदांबी श्रीकांतचा कडवा संघर्ष १९-२१, २१-१४, २१-११ असा तीन गेममध्ये मोडून काढला. श्रीकांतचा ५४ मिनिटांमध्ये पराभव झाला.

यांग, पोपोवचा पराभव

एच. एस. प्रणोय व किदांबी श्रीकांत यांचा पराभव झाला असला तरी लक्ष्य सेन व किरण जॉर्ज यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना भारतासाठी मोलाची कामगिरी बजावली. लक्ष्य याने वेंग यांग याच्यावर २४-२२, २१-१५ असा सहज विजय साकारला. लक्ष्य याने ५१ मिनिटांमध्ये विजयावर मोहोर उमटवली.

किरण याने टोमा पोपोव याची कडवी झुंज तीन गेममध्ये परतवून लावली. किरण याने १८-२१, २१-१६, २१-१९ अशी त्याच्यावर मात केली. किरण याला विजयासाठी १ तास व १२ मिनिटांचा अवधी लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com