INDvsENG: शतकी पंचसह घरच्या मैदानावर अश्विननं केली 'हवा'; कळलं का भावा!

INDvsENG, Ravichandran Ashwin
INDvsENG, Ravichandran Ashwin

INDvsENG 2nd Test : पहिल्या डावात पाच विकेट घेऊन इंग्लिंश फलंदाजांचे कंबरडे मोडणाऱ्या अश्विनने फलंदाजीची वेळ आल्यावर गोलंदाजांचीही जिरवली. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर त्याने आघाडीला सुरुंग लावणाऱ्या फिरकीचा नेटानं सामना केला. रविचंद्रन अश्विनने घरच्या मैदानावर कसोटी कारकिर्दीतील पाचव्या शतकाला गवसणी घातली.

आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर अश्विनने कर्णधार विराट कोहलीला उत्तम साथ दिली. या दोघांनी शतकी भागीदारीसह संघाचा डाव सावरला. विराट कोहली 62 धावांवर बाद होऊन परतल्यानंतर अश्विनने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. 134 चेंडूत त्याने शतक पूर्ण केले.गोलंदाजीतील कमालीच्या कामगिरीनंतर फलंदाजीतही त्याने हातसाफ केले. अश्विनच्या भात्यातून 4 वर्षानंतर शतक निघले आहे.

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने यापूर्वी  2016 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कॅरेबियन मैदानात शतकी खेळी साकारली होती. यावेळी त्याने 113 धावांची खेळी केली होती. अश्विनने एका सामन्यात पाच विकेट आणि शतकी खेळी करण्याचा पराक्रम तिसऱ्यांदा केलाय. 2011 मध्ये त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात 5/156 आणि 103  धावांची खेळी केली होती.  2016 मध्ये त्याने 7/83 आणि 113 असा पराक्रम वेस्ट इंडिज विरुद्धच केला. चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यातील इंग्लंडच्या पहिल्या डावात अश्विनने 43 धावा खर्चून अर्धा संघ तंबूत धाडला होता.  

पाच विकेटसह शतकी खेळी करणाऱ्या अष्टपैलूंच्या यादीत अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. इयान बॉथम यांनी 5 वेळा असा पराक्रम करुन दाखवला आहे. अश्विनने तिसऱ्यांदा अशी कामगिरी नोंदवली. गॅरी सोबर्स, मुश्ताक मोहम्मद,जॅक कॅलिस आणि शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी दोन वेळा अशी कामगिरी नोंदवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com