esakal | विराटची विकेट घेतल्यावर जेमिन्सनवर आक्षेपार्ह शब्दांचा मारा
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ

विराटची विकेट घेतल्यावर जेमिन्सनवर आक्षेपार्ह शब्दांचा मारा

sakal_logo
By
सुशांत जाधव

ICC World Test Championship Final : न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. विराट कोहली तिसऱ्या दिवशी मोठी खेळी करेल, असे वाटत होते. पण कायले जेमिसन याने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. आयपीएलमध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कायले जेमिन्सन आणि विराट कोहली यांच्यातील 'सामना' कसा होणार? याची देखील चर्चा रंगली होती. दुसऱ्या दिवसाच्या खेळात विराट कोहलीने त्याचे मनसुबे उधळून लावले. पण तिसऱ्या दिवसाच्या खेळात जेमिसनला 'विराट' विकेट मिळाली. विराट कोहली 124 चेंडूत 44 धावा करुन माघारी फिरला. (INDvsNZ WTC Final Indian Fans Abuse Kyle Jamieson After He Gets Virat Kohlis Wicket)

जेमिन्सन याने मोठे यश मिळवल्यानंतर कोहलीच्या चाहत्यांनी त्याच्यावर अपमानास्पद कमेंटचा मारा केलाय. आयपीएलमध्ये जेमिन्सन हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळतो. आपल्या कर्णधाराला त्याने आउट करायला नको होते, असे दाखले देत नेटकरी कायले जमीसनवर तुटून पडले आहेत. विराट कोहलीची विकेट सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरु शकते. पण विराट चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या कृत्याचे कधीही समर्थन करता येऊ शकत नाही.

हेही वाचा: WTC : पूनम पांडेचं क्रिकेटसंदर्भात पुन्हा 'बोल्ड' वक्तव्य

साउदम्टनच्या मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ड्यूक चेंडूचा वापर केला जात आहे. यापूर्वी जेमिन्सन विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये खेळताना खास किस्सा घडला होता. 15 कोटी खर्च करुन संघात घेतलेल्या जेमीसन याने विराट कोहलीला नेट प्रॅक्टिसमध्ये ड्यूक चेंडूवर गोलंदाजी करण्यास विनम्रपणे नकार दिला होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डॅन क्रिस्टियन याने एका युट्यूब चॅनेलवरील कार्यक्रमात खुलासा केला होता.

हेही वाचा: WTC INDvsNZ : टीम इंडियाला धक्क्यावर धक्के!

विराटच्या चतुराईवर जेमीचा विनम्रपणा

आयपीएलदरम्यान जेमिन्सन ड्यूक चेंडू आपल्यासोबत बाळगत असल्याचे विराट कोहलीला माहिती होते. त्याने गप्पा गोष्टी करताना जेमीला यासंदर्भात विचारले. एवढेच नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी जेमिन्सनच्या गोलंदाजीवर सराव करण्याचा प्लॅनही आखला. ड्यूकच्या चेंडूवर नेटमध्ये प्रॅक्टिस करायला आवडेल, असे कोहली म्हणाला होता. पण जेमिनन्सने त्याला नकार दिला. विराटच्या चतुराईवर जेमी भारी पडला. मागील वर्षी न्यूझीलंडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यातही जेमीसन याने विराटसह टीम इंडियातील दिग्गजांना चांगलेच अडचणीत आणले होते. आताही फायनलमध्ये असेच काहीसे चित्र दिसत आहे.

loading image