INDvsSA खेळपट्टीची सुरुवातीपासूनच फिरकीस साथ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

आजपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीतील पाचही दिवस पाऊस अधूमधून व्यत्यय आणण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस रोज पाऊस हजेरी लावत असल्यामुळे त्याचा खेळपट्टीवर निश्चितच परिणाम झाला असेल. त्यामुळे खेळपट्टी पहिल्या दिवसापासूनही फिरकीस साथ देण्याची शक्यता आहे. 

आजपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीतील पाचही दिवस पाऊस अधूमधून व्यत्यय आणण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस रोज पाऊस हजेरी लावत असल्यामुळे त्याचा खेळपट्टीवर निश्चितच परिणाम झाला असेल. त्यामुळे खेळपट्टी पहिल्या दिवसापासूनही फिरकीस साथ देण्याची शक्यता आहे. 

पहिली कसोटी आजपासून 
ठिकाण : वाय एस राजशेखर स्टेडियम, विशाखापट्टणम 
थेट प्रक्षेपण : सकाळी साडेनऊपासून स्टार स्पोर्टस्‌ 
गेल्या पाच कसोटीत : भारताचे तीन विजय आणि एक पराभव; तर आफ्रिकेचे तीन विजय आणि दोन पराभव 
हवामानाचा अंदाज : भारताच्या पूर्वकिनारपट्टीवरील या शहरातील कसोटीत पाचही दिवसांत अधूनमधून सरी. अर्थातच याचा खेळपट्टी तयार होण्यावर परिणाम. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार विशाखापट्टणम जिल्ह्यात दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी पाऊस जास्त. 
खेळपट्टीचा अंदाज : खेळपट्टी पूर्ण सुकलेली नसली तरी ती वेगवान गोलंदाजांना पूर्ण साथ देण्याची शक्‍यता कमी. त्याच वेळी फिरकीस साथ देणारी खेळपट्टी तयार केल्याचा प्रयत्न असल्याने पहिल्या दिवसापासून चेंडू हातभर वळण्याचाही धोका. 

हे महत्त्वाचे 
- विशाखापट्टणमची भारताची एकमेव कसोटी अनिर्णीत 
- जडेजा कसोटी बळींच्या द्विशतकापासून दोन विकेट दूर. हा टप्पा या कसोटीत पार केल्यास कमी कसोटीतील स्पर्धेत हरभजनला मागे टाकणार 
- आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज महाराज याला बळींचे शतक पूर्ण करण्यासाठी सहा विकेटची गरज 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvsSA pitch may help spinners from first day