Indian Boxing : भारतीय बॉक्सिंग संघटनेची जबाबदारी हंगामी समितीकडे
Global Boxing Federation : भारतीय बॉक्सिंग संघटनेची निवडणूक २ फेब्रुवारीला अपेक्षित होती, परंतु कायदेशीर अडचणीमुळे ती विलंबली आहे. जागतिक बॉक्सिंग संघटनेकडून हंगामी समिती नियुक्त करण्यात आली असून, ती ९० दिवसांत निवडणूक प्रक्रियेला पुढे नेईल.
नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंग संघटनेची निवडणूक २ फेब्रुवारीला अपेक्षित होती; पण कायदेशीर वादात अडकल्यामुळे अद्याप ही निवडणूक पार पडलेली नाही. भारतीय बॉक्सिंग संघटनेची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी जागतिक बॉक्सिंग संघटनेकडून पाऊल उचलण्यात आले आहे.