International Weightlifting Federation: आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने पुढील वर्षीच्या जून महिन्यापासून पुरुष आणि महिला वेटलिफ्टिंग स्पर्धांमधील वजनी गट कमी केले आहेत. आता दहाऐवजी आठ वजनी गटच असतील..पुरुष गटात ५५ किलो गट रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे आता ६० किलो गटापासून सुरुवात होईल. त्यामुळे ७०, ८० आणि ९० किलो या गटातही बदल करण्यात आले आहेत. नव्या प्रस्तावानुसार ६०, ६५, ७१, ७९, ८८, ९८ आणि ११० असे वजनी गट असतील. (आतापर्यंत ५५, ६१, ६७, ७३, ८१, ८९, ९६, १०२, १०९ आणि १०९+ किलो हे गट अस्तित्वात होते.).Weightlifting Video: मूर्ती लहान, पण कीर्ती महान! अवघ्या 9 वर्षांच्या अर्शियाने उचलले 75 किलो वजन.महिला विभागात ४५ किलो हा गट रद्द करण्यात आला असून त्याऐवजी ४८ किलो हा गट असेल. त्यानंतर ५३, ५८, ६३, ६९, ७७, ८६+ हे गट असतील (अगोदर ४५, ४९, ५५, ५९, ६४, ७१, ७६, ८१, ८७ आणि ८७+ हे गट होते.).२०२१ मधील टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत मीराबाई चानू हिने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते. हा गट नव्या प्रस्तावानुसार रद्द करण्यात आला आहे. यंदा झालेल्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी मोजकेच गट होते..Mirabai Chanu Olympic 2024 Live : मीराबाई चानूचेही पदक थोडक्यात हुकले; भारतीयांच्या दिवसाचा शेवटही 'कडू'!.पुरुषांसाठी ६१, ७३, ८९, १०२ आणि १०२+ तर महिलांसाठी ४९, ५९, ७१, ८१ आणि ८१+ या गट होते. मीराबाई चानू ४९ गटात सहभागी झाली होती. २०२८ लॉस एंजेलिस ऑलिंपिक स्पर्धेत कोणते गट असणार हे निश्चित नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.