India Host IOC Session भारतासाठी अभिमानास्पद क्षण : नीता अंबानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IOC member Nita Ambani

India Host IOC Session भारतासाठी अभिमानास्पद क्षण : नीता अंबानी

मुंबई : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची पुढील बैठक जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे होणार आहे. 2023 मध्ये होणाऱ्या या वार्षिक सभेच्या यजमानपदासाठी झालेल्या मतदानात भारताला 76 मतांपैकी 75 मते मिळाली. प्रचंड बहुमताने होस्टिंग अधिकार जिंकल्यानंतर, आयओसी सदस्य आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. (IOC member Nita Ambani Reaction On India hosting IOC session After 40 yrs)

भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना नीता अंबानी यांनी आयओसीच्या आगामी बैठकीत भारतात होण्यासाठी जोरदार वकिली केली. त्यांनी आयओसी सदस्यांना सांगितले की, “भविष्यात युवा ऑलिम्पिक आणि ऑलिम्पिक खेळ भारतात आणण्याचे आमचे स्वप्न आहे. जगातील सर्वात तरुण देश असलेल्या भारतातील तरुणांनी ऑलिम्पिकची भव्यता आणि दिव्यता अनुभवावी अशी आमची इच्छा आहे. आम्हाला ही भागीदारी आणखी मजबूत करायची आहे”

आयओसी वार्षिक बैठक भारतात आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, नीता अंबानी म्हणाल्या, "40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑलिम्पिक चळवळ भारतात परत येत आहे! 2023 मध्ये मुंबईत आयओसी सत्र आयोजित करण्याचा मान भारताला दिल्याबद्दल मी ऑलिम्पिक समिती बद्दल कृतज्ञता व्यक्त करते. ही भारतीय खेळांसाठी एका नव्या युगाची सुरुवात ठरेल." नीता अंबानी यांनी 2023 च्या ऑलिम्पिक हंगामाच्या निमित्ताने वंचित समुदायातील तरुणांसाठी विशिष्ट क्रीडा विकास कार्यक्रमांची मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव देखील मांडला.

हेही वाचा: बिजींग IOC अधिवेशनात नीता अंबानी; CM उद्धव ठाकरेंचा खास मेसेज

भारतीय शिष्टमंडळात नीता अंबानी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्ष डॉ. नरिंदर बत्रा, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि नेमबाजीतील ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांचा समावेश होता. बीजिंगमध्ये सुरू असलेल्या आयओसीच्या वार्षिक अधिवेशनात, आगामी बैठकीचे यजमानपद देण्यासाठी भारतीय शिष्टमंडळ व्हर्चुअली भारताच्या बाजूने सामील झाले.

हेही वाचा: कोहलीचा विक्रम हुकला! टी-20 चा किंग व्हायला 1 चौका पडला कमी

चार दशकांनंतर भारतात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होणार आहे. शेवटचा कार्यक्रम 1983 मध्ये झाला होता. सत्रात, आयओसी सदस्य ऑलिम्पिक चार्टर आणि ऑलिम्पिकच्या यजमान शहराची निवडणूक यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नरिंदर बत्रा यांनी एका निवेदनात म्हटले आहे: "मी श्रीमती नीता अंबानी यांची दूरदृष्टी, नेतृत्व आणि त्यांना समर्थन दिल्याबद्दल माझ्या सर्व आयओसी सहकाऱ्यांचे आभार मानतो. पुढच्या वर्षी तुम्हाला मुंबईत भेटण्यास उत्सुक आहे. खेळांसाठी एक नवीन युग सुरू होत आहे. आमच्या पुढच्या पिढीचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ऑलिम्पिक चळवळीने मध्यवर्ती भूमिका बजावावी अशी आमची इच्छा आहे. 2023 मध्ये मुंबईत एक संस्मरणीय आयओसी सत्र आयोजित करणे, हा भारताच्या नवीन क्रीडा क्षमतेचे प्रदर्शन करण्याचा एक मार्ग आहे. त्या दृष्टीने हे पहिले पाऊल असेल. ."

• 2023 मध्ये मुंबईतील 'जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर' येथे बैठक होणार

• ऑलिम्पिक स्पर्धांच्या आयोजनाच्या वाटेवर भारताचे पहिले पाऊल

• चार दशकांनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन भारतात

Web Title: Ioc Member Nita Ambani Reaction On India Hosting Ioc Session After 40 Yrs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top