IPL 2020 KXIPvsRCB : विराटचा आपल्या लाडल्याविरुद्ध सामना!

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 24 September 2020

दुबई : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाब दुबईच्या मैदानावर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्द मैदानात उतरलाय. पहिल्या सामन्यातील चुका टाळूत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवण्यासाठी पंजाबचा संघ उत्सुक असेल. दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विजयाचे सातत्य कायम राखून स्पर्धेतील दबदबा निर्माण करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल विराटच्या विरुद्द लागला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरुन त्यांनी सनरायझर्स हैदराबादला रोखत स्पर्धेतील पहिला सामना जिंकला होता. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबला ते पराभूत करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला दिल्ली विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. ते पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत.  भारतीय संघात लोकेश राहुल हा विराटच्या लाडक्या शिलेदारांपैकी एक आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणे आणखी रोमहर्षक ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL 2020 KXIPvsRCB 6th Match Virat Kohali and kl rahul Cricket Score Record