IPL 2020 : मंदीचा फटका 'आयपीएल'लाही; बक्षिस रक्कम निम्म्यावर!

IPL-2020
IPL-2020

नवी दिल्ली : क्रिकेट विश्‍वात सर्वात श्रीमंत संघटना असलेल्या बीसीसीआयलाही मंदीचा फटका बसू लागला आहे. त्यांनीही 'कॉस्ट कटिंग' सुरु केले असून यंदाच्या मोसमातील बक्षिस रक्कम निम्म्यावर आणली आहे. गतवर्षी विजेत्या मुंबई इंडियन्सने 20 कोटींचे इनाम जिंकले होते. यंदा विजेत्याची रक्कम 10 कोटी इतकीच असेल. 

बीसीसीआयने सर्व फ्रॅंचाईसना पत्र लिहून बक्षिस रक्कम निम्मी करण्यात आल्याचे कळवले आहे. त्यानुसार उपविजेता 12.5 कोटी ऐवजी 6.25 कोटींचा मानकरी ठरेल. तसेच क्‍लालिफायरमध्ये पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी 4.375 कोटी मिळतील. 

फ्रॅंचाईसची आर्थिक बाजू चांगली असते ते वैयक्तिक प्रायोजक मिळवून त्यांचे उत्पन्न वाढवू शकतात, म्हणून आम्ही बक्षिस रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बीसीसीआयच्या सुत्रांचे म्हणणे आहे. 

आयोजनासाठी दुप्पट खर्च 

एकीकडे बक्षिस रक्कम अर्ध्याने कमी होत असताना दुसरीकडे सर्व फ्रॅंचाईसना जवळपास दुप्पट खर्च करावा लागणार आहे. आपापले सामने आयोजित करण्यासाठी प्रत्येक फ्रॅंचाईसला होम क्रिकेट संघटनेसाठी 50 लाख द्यावे लागणार आहेत. ही रक्कम यंदा 20 लाखांहून वाढली आहे. यजमान संघटनेला प्रत्येक सामन्यासाठी 1 कोटी मिळतील यातील 50 लाख बीसीसीआय देणार आहे. 

यंदाची आयपीएल 29 मार्चपासून सुरु होत असून सलामीला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि माजी विजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. 

स्पर्धा तोंडावर आलेली असताना बीसीसीआयच्या या अनपेक्षित चालीमुळे आम्ही निराश झालो आहोत. एवढा मोठा निर्णय घेण्याअगोदर किमान आमच्याशी चर्चा करायची होती. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही बीसीसीआय पदाधिकाऱ्यांशी लवकरच बैठक घेणार आहोत. 
- एक आयपीएल फ्रॅंचाईस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com