esakal | IPL 2021: अफगाणिस्तानचे खेळाडू स्पर्धेसाठी युएईमध्ये दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Rashid-Nabi

IPL 2021: अफगाणिस्तानचे खेळाडू स्पर्धेसाठी युएईमध्ये दाखल

sakal_logo
By
विराज भागवत

१९ सप्टेंबरपासून IPL च्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरूवात

IPL 2021 in UAE: विविध ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय मालिका संपवून खेळाडू युएईमध्ये दाखल होत आहेत. IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. पण युएईमध्ये येणाऱ्यांना सहा दिवसांचे सक्तीचे क्वारंटाइन असल्याने खेळाडू लवकरात लवकर युएईत येत आहेत. अफगाणिस्तानवर तालिबानी राजवटीने आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर त्यांचे खेळाडू IPL साठी उपलब्ध असतील की नसतील, याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. त्या साऱ्यांच्या शंकांना पूर्णविराम मिळाला. अफगाणिस्तानचे काही खेळाडू युएईमध्ये दाखल झाल्याने सांगण्यात आले आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघात अफगाणिस्तानचे दमदार अष्टपैलू खेळाडू राशिद खान आणि मोहम्मद नबी आहेत. हे दोघे युएईमध्ये सुखरूप दाखल झाले असल्याची माहिती SRH कडून देण्यात आली. या दोघांनी IPL साठी आपण उपलब्ध असल्याचे आधीच कळवलं होतं. पण देशावर विचित्र संकट आलं असताना हे लोक येण्यास सक्षम ठरतील का अशी चर्चा होती. पण अखेरीस आज दोघेही युएईमध्ये दाखल झाले. ते दोघे सध्या सहा दिवसांच्या सक्तीच्या क्वारंटाइनमध्ये असून त्यानंतर खेळण्यासाठी मैदानात उतरतील, असे SRH संघाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

loading image
go to top