esakal | IPL मुंबईत शिफ्ट करण्याचा विचार; BCCI समोर बायो-बबलचे आव्हान

बोलून बातमी शोधा

IPL
IPL मुंबईत शिफ्ट करण्याचा विचार; BCCI समोर बायो-बबलचे आव्हान
sakal_logo
By
टीम ई सकाळ

इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 14 व्या हंगामातील दिल्ली आणि अहमदाबाद मैदानात सुरु असलेल्या सामन्यात कोरोनाने अडथळा निर्माण झालाय. या दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. सामने मुंबईला शिफ्ट करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. वेळापत्रकात बदल झाल्यास डबल हेडरच्या लढती वाढण्याची शक्यता असून नियोजित फायनल जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते.

हेही वाचा: IPL 2021 : स्पर्धा संकटात; बायोबबलमध्ये कोरोना आला कसा?

कसा असेल बायो-बबल

ईएसपीएन क्रिकइंफोच्या वृत्तानुसार, आयपीएल मुंबईमध्ये शिफ्ट करताना बायो-बबल तयार करणे मोठे आव्हान असेल. 8 टीमसाठी हॉटेल आणि स्टेडियम तयार करण्याची मोठी कसोटी बीसीसीआयसमोर असेल. मुंबईतील वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्राबोन या स्टेडियमचा एप्रिलमध्ये आयपीएलसाठी वापर करण्यात आला होता. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात वानखेडेच्या मैदानात मॅच खेळवण्यात आल्या होत्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बांद्रा-कुल्रा कॉम्प्लॅक्स आणि अन्य दोन मैदानांचा वापर हा प्रॅक्टिस सेशनसाठी करण्यात आला होता.