esakal | IPL 2021; CSK vs DC : दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईला सहज नमवले

बोलून बातमी शोधा

CSK VS DC

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय 

IPL 2021; CSK vs DC : दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईला सहज नमवले
sakal_logo
By
टीम सकाळ

IPL 2021 CSK vs DC, 2nd Match : चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सने मुंबईच्या वानखेडेच्या मैदानातील सामन्यातून स्पर्धेला सुरुवात केली. अनुभवी टीमचा दिग्गज कर्णधार महेंद्र सिंह धोनी वर्सेस युवा संघाचा कर्णधार रिषभ पंत यांच्यात युवा जोश भारी ठरला. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जने दिलेले 189 धावांचे आव्हान सहज पार केले, 

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सुरेश रैनाच्या दमदार अर्धशतकानंतर सॅम कुरेन (34) आणि रविंद्र जडेजा (26) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्ससमोर 189 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. 

 अपडेट्स

186-3 : स्टॉयनिस 14 धावा करुन परतला, शार्दुल ठाकूरला यश

167-2 : धवनच्या रुपात शार्दुलला मिळाले यश, शिखर धवनने 85 धावांची खेळी केली

138-1 : 38 चेंडूत 72 धावांची खेळी करुन पृथ्वी शॉ माघारी

--------------------------------------------------------------------------------------------
137-6 : आवेश खानने धोनीला खातेही उघडू दिले नाही

137-5 : महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी करुन रैना झाला रन आउट, 36 चेंडूत 54 धावांची खेळी

123-4 : टॉम कुरेन याने अंबाती रायडूची घेतली विकेट, त्याने 16 चेंडूत 23 धावा केल्या

60-3 : 24 चेंडूत 36 धावा करुन मोईन अली परतला, अश्विनला मिळाले यश

 

7-2 : क्रिस वोक्सने ऋतूराज गायकवाडला धाडले माघारी, त्याने 8 चेंडूत 5 धावा केल्या

7-1 आवेश खानने CSK सलामीवीर फाफ ड्युप्लेसीसला खातेही उघडू दिले नाही

नाणेफेक जिंकून पंतने घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

Chennai Super Kings (Playing XI): ऋतूराज गायकवाड, अंबाती रायडू, फाफ ड्युप्लेसीस, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), मोईन अली, रविंद्र जडेजा, सॅम कुरेन, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर.

शास्त्री गुरुजी म्हणाले; धोनी vs पंत सामना पाहण्यापेक्षा ऐकायला मजा येईल​

Delhi Capitals (Playing XI): शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक) मार्नस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, क्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, टॉम कुरेन, अमित मिश्रा, आवेश खान