esakal | वॉर्नर-स्लेटर दोस्ती अतूट; बारमध्ये हाणामारी केल्याचे वृत्त फेटाळले
sakal

बोलून बातमी शोधा

David Warner and Michael Slater

वॉर्नर-स्लेटर दोस्ती अतूट; बारमध्ये राडा केल्याचे वृत्त खोटे

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 :आयपीएलच्या 14 व्या हंगामातील स्पर्धा निम्म्यावरच स्थगित करण्याची वेळ आयोजकांवर ओढावली. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू (Australian Players) चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियान सरकारने भारत- ऑस्ट्रेलिया प्रवासावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे 15 मे पर्यंत आय़पीएलमध्ये सहभागी झालेल्या कोणत्याही खेळाडूला मायदेशात जाता येणार नाही. भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मालदिवमध्ये (Quarantine in Maldives Hotel) पोहचवले असून तेथूनच खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडू निर्बंध हटण्याची प्रतिक्षा करत असताना सनरायझर्स हैदराबादचा स्टार खेळाडू डेविड वॉर्नर आणि कॉमेंट्री पॅनलमधील सदस्य माइकल स्लेटर यांच्यात वाद झाल्याचे वृत्त चर्चेत आले. मालदीवमधील एका बारमध्ये दोघांच्यात राडा झाल्याचे वृत्त दोघांनीही फेटाळले आहे.

कोणत्या तरी मुद्यावरुन वॉर्नर आणि स्लेटर यांच्यात मतभेद झाले. हा वाद इतका वाढला की मालदीवमधील बारमध्येच दोघांच्यात हाणामारी झाली, असे वृत्त ऑस्ट्रेलियन मीडियातील द डेली टेलिग्राफने दिले होते. वॉर्नर आणि स्लेटर यांनी ही बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. ही बातमी खोटी असून आम्ही दोघं आजही जवळचे मित्र आहोत, असे स्पष्टीकरण दोन्ही दिग्गजांनी दिले आहे.

हेही वाचा: ऑसी मालदीवला पोहचले, हसी-बालाजी एअर अ‍ॅम्बुलन्समधून चेन्नईला

दोघांच्यामध्ये राडा झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरत असताना माइकल स्लेटर यांनी एका सीनियर जर्नलिस्टला मेसेज करुन ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. डेवी (वॉर्नर) माझा चांगला मित्र असून आमच्यातील मैत्री अतूट आहे, असे स्लेटर यांनी म्हटले आहे. डेविड वॉर्नरनेही वादाचे वृत्त फेटाळून लावले आहे. याठिकाणी काही ड्रामा झाल्याचे मला माहित नाही. कोणीही याठिकाणी उपस्थितीत नाही. अशा बातम्या त्यांना कुठून मिळाल्या माहित नाही. पुराव्याशिवाय उगाच काहीही लिहू नका, अशा शब्दांत वॉर्नरने बातमी पसरवणाऱ्यांचा समाचार घेतलाय.

डेविड वॉर्नर आयपीएलमधअये सनरायझर्स हैदराबादचा सदस्य होता. संघाच्या खराब कामगिरीमुळे वॉर्नरकडून नेतृत्वाची जबाबदारी केन विल्यमसनकडे देण्यात आली होती. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघाने 7 पैकी केवळ एकच मॅच जिंकली होती. अखेरच्या सामन्यात वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळाले नव्हते. दुसरीकडे स्लेटर आयपीएलच्या 14 व्या हंगामात कॉमेंट्री पॅनलचा भाग होते. स्लेटर यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनी भारत-ऑस्ट्रेलिया प्रवासावर निर्बंध घातल्याच्या निर्णयावर टीका केली होती.