esakal | IPL 2021: हिटमॅनचा सिक्सर पाहून नताशा झाली शॉक; व्हिडिओ व्हायरल

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma
IPL 2021: हिटमॅनचा सिक्सर पाहून नताशाही झाली शॉक; व्हिडिओ व्हायरल
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

IPL 2021 DC Vs MI: आयपीएल 2021 (IPL 2021) च्या 14 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Delhi Capitals Vs Mumbai Indians) यांच्यात रंगतदार सामना पाहायला मिळाला. युएईमध्ये रंगलेल्या आयपीएलच्या हंगामात फायनलमध्ये भिडलेल्या दोन संघात दिल्ली कॅपिटल्सचा संघ भारी पडला. मागील हंगामात ज्या दिल्ली कॅपिटल्सला नमवून मुंबई इंडियन्सने विक्रमी चॅम्पियन होण्याचा पराक्रम केला त्यांच्यासमोर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. अमित मिश्रा (Amit Mishra) च्या फिरकीसमोर मुंबई इंडियन्सची तगडी बॅटिंग लाईन हतबल ठरली. मुंबई इंडियन्सला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी रोहित शर्माने आपल्या बॅटिंगने चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय सार्थ ठरवण्यासाठी सलामीवीर रोहित शर्माने आपले आक्रमक तेवर दाखवून दिले. आपल्या 44 धावांच्या इनिंगमध्ये राहित शर्माने (Rohit Sharma) गगनचुंबी सिक्सरही लगावले. त्याने या मॅचमध्ये मारलेला 95 मीटर सिक्सर जबरदस्त असाच होता. हिटॅनचा हा फटका पाहून व्हीआयपीए प्रेक्षक गॅलरीत बसलेली हार्दिक पांड्याची पत्नी (Hardik Pandya Wife) नताशा (Natasa Stankovic) च्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे होते. सोशल मीडियावर (Social Media) यासंदर्भातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे.

मुंबई इंडियन्सच्या धावफलकावर 4 षटकात 1 बाद 38 धावा असताना कगिसो रबाडा गोलंदाजीसाठी आला. त्याच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने गगनचुंबी सिक्सर ठोकला. रोहितने मारलेला चेंडू खेळाडूंच्या पत्नी ज्या ठिकाणी बसल्या होत्या त्या ठिकाणी जाऊन पडला. या फटक्यावर रोहितची पत्नी रितिकाही टाळ्या वाजवताना दिसली.