esakal | IPL च्या उर्वरित सामन्यासाठी BCCI ला परदेशातून आली ऑफर
sakal

बोलून बातमी शोधा

ipl

IPL च्या उर्वरित सामन्यासाठी BCCI ला परदेशातून आली ऑफर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Covid) स्थगित झालेली आयपीएल स्पर्धेतील (ipl tournament) उर्वरित सामने कोणत्या ठिकाणी नियोजित केले जाणार? असा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरतोय. 14 व्या सीझनमधील 29 व्या सामन्यानंतर स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने (BCCI) घेतला. कोलकाता नाईट रायडर्स (KKR), चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि सनरायझर्स हैदराबादसह (SRH) दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) ताफ्यातील काही खेळाडंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर उर्वरित सामने UAE च्या मैदानात खेळवण्यात येणार का? असा प्रश्न बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनाही एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता.

हेही वाचा: कोरोनाच्या लढ्यासाठी 'विरुष्का' मैदानात

सध्याच्या घडीला यासंदर्भात काहीच सांगता येत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता आयपीलच्या 14 व्या हंगामातील उर्वरती सामन्याच्या आयोजनासाठी बीसीसीआयला परदेशातून ऑफर आल्याची माहिती समोर येत आहे. इंग्लिश काउंटीच्या एका ग्रुपने सप्टेंबरमध्ये आयपीएलमधील उर्वरित सामन्यांचे यजमानपदासाठी उत्सुकता दाखवली आहे. त्यांनी बीसीसीआयला ऑफरही दिलीये. बीसीसीआय यांदसर्भात काय विचार करणार हे पाहावे लागेल.

द किआ ओव्हल, एजबेस्टन आणि अमीरात ओल्ड ट्रॅफर्ड समुहाचा भाग असलेल्या एमसीसी, सरे, वारविकशायर (Warwickshire) आणि लंकाशायर (Lankashire) यांनी आयपीएलच्या आयोजनासंदर्भात ईसीबी पत्र लिहिले आहे. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, हा मुद्दा आसीसीच्या व्हर्चुअल बैठकीत मांडण्यात येणार असून आयपीएलच्या आयोजनासंदर्भाची चाचपणी करण्यात येईल.

हेही वाचा: IPL 2021: आता स्पर्धा UAE त होणार? गांगुली म्हणाले...

आयपीएलशिवाय काउंटी क्रिकेट ग्रुपने म्हटलंय की, खेळाडूंना आगामी आंतरराष्ट्रीय टी 20 वर्ल्ड कपसाठी तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरले, यावरही आम्ही भर देऊ. आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आल्यानंतर भारतात होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेसंदर्भातही प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले आहे. बीसीसीआयकडून जुलैपर्यंत आयपीएल आणि आयसीसी टी-20 संदर्भात निर्णय घेतला जाईल.