राणादाच्या बायकोची कमाल; सोशल मीडियावर व्हिडिओ करतोय धमाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitish rana

राणादाच्या बायकोची कमाल; सोशल मीडियावर व्हिडिओ करतोय धमाल

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या 14 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) ताफ्यातून धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या नितीश राणाची पत्नी सध्या चांगलीच चर्चेत आहे. राणादाची पत्नी साची मारवाह हिने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यामुळे ती चर्चेत आलीये. या व्हिडिओमध्ये साचीने नितीश राणाला आपल्या पाठिवर घेतल्याचे दिसते. यापुढे जाऊन ती दंड बैठक काढतानाही पाहायला मिळते. (IPL 2021 kkr batsman nitish-rana and wife saachi marwahs video is going-viral watch Video)

क्वीट कपल नितीश राणा आणि साची यांचा हा व्हिडिओ केकेआरने आपल्या अधिकृत अकाउंटवरुनही शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून काहींना विराट-कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओची आठवण झालीये. एका जाहिरातीमध्ये अनुष्काने विराट कोहलीला उचलल्याचे पाहायला मिळाले होते.

हेही वाचा: WTC : चॅम्पियन्स रुबाबसाठी हिटमॅनचा तोरा ठरेल महत्त्वाचा

साचीने हा व्हिडिओ शेअर करताना खास कॅप्शनही दिले आहे. नितीशने मला स्ट्राँग रहायला सांगितले आहे. मी नेहमी तुझ्या सोबत असेन, असे म्हणत कोण अधिक स्टाँग आहे? असा प्रश्नही तिने उपस्थितीत केला. आयपीएलच्या 14 व्या हंगामात साची आयपीएलच्या बायोबबलचा भाग होती. केकेआरच्या सामन्यात ती संघाला चेअर करताना दिसली होती.

हेही वाचा: सलमान म्हणतो, कॉन्फिडन्स नसल्यामुळे कुलदीप मार खातोय

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातील वरुण चक्रवर्ती, संदीप वारियर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर लागोपाठ अन्य काही खेळाडूंचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आयोजकांना 14 व्या हंगामातील आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी नितीश राणाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तो मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते.

loading image
go to top