esakal | IPL 2021: मिसरुड नसलेल्या पोरानं घेतली गेलची विकेट (VIDEO)

बोलून बातमी शोधा

KKRVSPBKS
IPL 2021: मिसरुड नसलेल्या पोरानं घेतली गेलची विकेट (VIDEO)
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता नाईट राइडर्स (KKR) संघाने पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. इयॉन मॉर्गनने घेतलेला निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. त्यांनी पंजाबच्या संघाला अवघ्या 123 धावांत रोखले. 5 पैकी 4 सामने गमावल्यानंतर सहाव्या सामन्यात (PBKS vs KKR) चांगली सुरुवात केली. पावर प्लेमध्ये 22 वर्षीय युवा जलदगती गोलंदाज शिवम मावीने (Shivam Mavi) उत्तम गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. स्फोटक आणि धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) ची विकेटही त्याला मिळाली.

क्रीडा क्षेत्रातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

शिवम मावी वर्सेस ख्रिस गेल यांच्यातील लढाईत विकेटमागे असणाऱ्या दिनेश कार्तिकने महत्त्वाची भूमिका पार पाडली. शिवम मावीने टाकलेला चेंडू गेलच्या बॅटची कड घेऊन विकेट किपर दिनेश कार्तिकच्या हातात विसावला. अपीलवर पंचांनी त्याला नाबाद ठरवले. दिनेश कार्तिकने आत्मविश्वासाने DRS घेतला. आणि कोलकाताला गेलची विकेट मिळाली. गेलला खातेही उघडता आले नाही.

शिवम मावीने 4 ओव्हरमध्ये 13 धावा खर्च करुन एक विकेट घेतली. त्याने यातील तीन ओव्हर या पावर प्लेमध्ये टाकल्या. शिवमचा जन्म 26 नोव्हेंबर 1998 चा आहे. दुसऱ्या बाजूला स्फोटक गेल 41 वर्षांचा आहे. ख्रिस गेलने ऑक्टोबर 1998 मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. याचा मावीच्या जन्माच्या अगोदरपासून गेल क्रिकेट खेळतोय. त्याची विकेट मावीसाठी आत्मविश्वास द्विगुणित करणारी अशीच आहे.