esakal | VIDEO : रबाडासमोर गेल भाऊ गडबडला? फुलटॉसवर उडाल्या दांड्या

बोलून बातमी शोधा

chris gayle
VIDEO : रबाडासमोर गेल भाऊ गडबडला? फुलटॉसवर उडाल्या दांड्या
sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (DC) कर्णधार रिषभ पंत याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत प्रभसिमरन आणि मयांक अग्रवाल जोडीने पंजाबच्या डावाला सुरुवात केली. रबाडाने 17 धावांवर पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन याला तंबूचा रस्ता दाखवला. तो स्टिव्ह स्मिथकडे कॅच देऊन स्वस्तात माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या स्फोटक फलंदाज गेललाही रबाडाने फार काळ टिकू दिले नाही.

पंजाबच्या डावातील चौथ्या ओव्हरमध्ये रबाडाच्या एका फुलटॉस चेंडूवर गेलने विकेट फेकली. या चेंडूवर नेमक काय करायच? असा मोठा संभ्रम गेलच्या मनात निर्माण झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. बॅट घालायची की काढायची या संभ्रम अवस्थेत दांड्या कधी उडल्या हे गेललाही कळले नाही. त्याने 9 चेंडूत 13 धावांची खेळी केली. एक चौकार आणि एक षटकार खेचला. ख्रिस गेल आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात खेळताना दिसले आहे. पण त्याला मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलाय. त्याने आतापर्यंतच्या 8 सामन्यात 178 धावा केल्या आहेत. यात 46 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. 25.42 च्या सरासरीने केलेल्या धावा पंजाबच्या संघाची डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत.