esakal | IPL 2021 : संजूच्या विक्रमी शतकाला पराभवाचं ग्रहण! पंजाबचा भांगडा

बोलून बातमी शोधा

sanju samson

यंदाच्या हंगामात नाव आणि नव्या जर्सीसह मैदानात उतरलेल्या पंजाबने 4 धावांनी सामना खिशात घातला. 

IPL 2021 : संजूच्या विक्रमी शतकाला पराभवाचं ग्रहण! पंजाबचा भांगडा
sakal_logo
By
टीम सकाळ

वानखेडेच्या मैदानात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या 200 पारच्या लढाईत अखेर पंजाबाने बाजी मारली. धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने विक्रमी शतक केले. पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावा हव्या असताना अर्शदीपच्या गोलंदाजीवर संजू झेलबाद झाला. त्याने 63 चेंडूत 119 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. 222 धावांचे टार्गेट चेस करताना राजस्थानचा संघ निर्धारित 20 षटकात 7 बाद 217 धावांपर्यंत मजल मारु शकला. यंदाच्या हंगामात नाव आणि नव्या जर्सीसह मैदानात उतरलेल्या पंजाबने 4 धावांनी सामना खिशात घातला. 

RR vs PBKS : रियानची अंडरआर्म बॉलिंग; अंपारयरने दिली वॉर्निंग (VIDEO)

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राहुल आणि मयंकने पंजाबच्या डावाची सुरुवात केली. कर्णधार लोकेश राहुलने 50 चेंडूत 91 धावा आणि दीपक हुड्डाने 28 चेंडूत केलेली 64 धावांची आतषबाजीच्या जोरावर पंजाबच्या संघाने निर्धारित 20 षटकात 6 बाद 221 धावा केल्या. ख्रिस गेलने 28 चेंडूत 40 धावांची उपयुक्त खेळी केली. या तिघांच्या दमदार खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने निर्धारित 20 षटकात 6 बाद 221 धावा केल्या होत्या. 

IPL 2021 : ट्रक ड्रायव्हरच्या पोराची धमाकेदार एन्ट्री

या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवातच खराब झाली. बेन स्टोक्सला मोहम्मद शमीने खातेही उघडू दिले नाही. मनन वोहरा 12 धावा करुन परतला. जोस बटलर  25 (13), शिवम दुबे 23(15), रियान पराग 25 (11) धावा करुन परतल्यानंतर संजूने कर्णधाराला साजेसा खेळ करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. संजू सॅमसन याने 63 चेंडूत 119 धावांची खेळी केली. यात त्याने 12 चौकार आणि 7 षटकार खेचले. अर्शदीपने त्याची विकेट घेत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.