esakal | RCB vs KKR : रॉयल चेलेंजर्सची विजयी हॅटट्रिक
sakal

बोलून बातमी शोधा

RCB cs KKR

RCB vs KKR : बंगळूरसमोर कोलकाताचा बार फुसका

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

IPL 2021, RCB vs KKR : चिदंबरम स्टेडियमवर दीडशे धावा करताना दमछाक होत आहे. तेथे बंगळूर संघाने द्विशतकी धावा उभारल्या आणि ताकदवर कोलकाताचा ३८ धावांनी पराभव करून यंदाच्या आयपीएलमधील विजयी घोडदौड कायम राखली. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिल्यर्स यांची तोडफोड फलंदाजी कोलकाता गोलंदाजांना सळो की पळो करणारी ठरली. दुसऱ्या षटकात दोन बाद नऊ अशी दारुण सुरुवात झालेल्या बंगळूरने २० व्या षटकाअखेर ४ बाज २०४ धावा केल्या. त्यानंतर कोलकाताचा एकेक मोहरा बाद करून त्यांना १६६ धावांत रोखले.

यंदाच्या आयपीएलमध्ये दुपारी झालेला हा पहिला सामना होता. मॅक्सवेल-डिव्हिल्यर्स विरुद्ध पूर्ण कोलकाता संघ असे लढतीचे स्वरूप होते. मॅक्सवेलने ४९ चेंडूंत ७८; तर डिव्हिल्यर्सने ३४ चेंडूंत नाबाद ७६ धावा करून सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता. कोलकाता संघाकडे मॉर्गन, आंद्रे रसेल, शकिब अल हसन असे विख्यात आंतरराष्ट्रीय फलंदाज आहेत; पण बंगळूरच्या गोलंदाजांनी त्यांना विजयापासून दूरच ठेवले.

IPL 2021 : गब्बर बोल्ड: नव्वदीच्या घरात असा शॉट कोण खेळत? (VIDEO)

मॅक्सवेल बंगळूरसाठी हुकमी एक्का ठरत आहे. आत्तापर्यंत त्यांनी मिळवलेल्या तिन्ही विजयात मॅक्सवेलने भलतीच आक्रमक फलंदाजी केली आहे. गत आयपीएल स्पर्धेत एकही षटकार न मारू शकलेला मॅक्सवेल आता षटकारांचा पाऊस पाडत आहे. रिव्हर्स स्वीपच्याही फटक्यांचा तो खुबीने वापर करत आहे. मॅक्सवेल बाद झाला तेव्हा बंगळूरच्या १७ षटकांत १४८ धावा झाल्या होत्या पुढच्या तीन षटकांत त्यांनी ५६ धावा कुटल्या. यात डिव्हिल्यर्सची ७६ धावांची खेळी महत्त्वाची ठरली. त्याने अखेरच्या षटकांत रसेलची फारच धुलाई केली.

द्विशतकी आव्हानासमोर कोलकाताच्या शुभमन गिलनने ९ चेंडूंत २१ धावा करून आशा निर्माण केल्या होत्या; परंतु सातत्यामध्ये गिल अपयशी ठरत आहे. कोलकाताच्या एकाही फलंदाजाला धैर्य दाखवता आले नाही. नीतिश राणा, राहुल त्रिपाठी जम बसवल्यावर बाद झाले. ऑईन मॉर्गनलाही आपला लौकिक दाखवता आला नाही. शकीब अल हसननेही निराशा केली. सर्वात स्फोटक फलंदाज आंद्रे रसेसला तर महम्मद सिराजने जखडून टाकले.

संक्षिप्त धावफलक

बंगळूर : २० षटकात ४ बाद २०४ (ग्लेन मॅक्सवेल ७८ -४९ चेंडू, ९ चौकार, ३ षटकार, एबी डिव्हिल्यर्स ७६ -३४ चेंडू, ९ चौकार, ३ षटकार, वरुण चक्रवर्ती ३९-२) वि. वि. कोलकाता ः २० षटकांत ८ बाद १६६ (शुभमन गिल २१ -९ चेंडू, २ चौकार, २ षटकार, ऑईन मॉर्गन २९ -२३ चेंडू, १ चौकार, २ षटकार, आंद्रे रसेल ३१ -२० चेंडू, ३ चौकार, २ षटकार, जेमिंन्सन ४१-२, युजवेंद्र चहल ३४-२, हर्षल पटेल १७-२)

114-5 : 23 चेंडूत 29 धावा करुन KKR चा कर्णधारही तंबूत, हर्षल पटेलला मिळाली विकेट

IPL 2021, RCB vs KKR : पुण्याच्या राहुलचा जबऱ्या कॅच; मिस्ट्री स्पिनरच्या नावे 'विराट' विकेट (VIDEO)

 • 74-4 : चहलने दिनेश कार्तिकच्या 2 (5) रुपात घेतली दुसरी विकेट; कोलकाता संघाला चौथा धक्का

 • 66-3 : नितीश राणाही फिरला माघारी, चहलने 18 धावांवर खेळणाऱ्या राणादाची घेतली फिरकी

 • 57-2 : राहुल त्रिपाठीच्या रुपात कोलकाताला दुसरा धक्का, 20 चेंडूत 25 धावा केल्यानंतर वॉशिंग्टनने दिला चकवा

 • 23-1 कोलकाताच्या संघाची खराब सुरुवात शुभमन गिल 9 चेंडूत 21 धावा करुन परतला माघारी, ख्रिस्टन जेमिसनला मिळाले यश

IPL Fastest Fifties Record : एबी कितव्या नंबरला पोहचला माहितेय?

 • कोलकाताकडून आंद्रे रसेल सर्वात महागडा गोलंदाज ठरला. रसेलनं दोन षटकात 38 धावा खर्च केल्या. वरुण चक्रवर्तीला दोन विकेट घेण्यात यश आलं तर प्रसिद्ध कृष्णा आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी एक- एक बळी मिळला.

 • एबी डिव्हिलिअर्सनं डेथ ओव्हरमध्ये कोलकाताच्या गोलंदाजांती पिसे काढली. एबीने 34 चेंडूत 76 धावांची खेळी केली. यादरम्यान त्यानं तीन षटकार आणि 9 चौकार लगावले.

 • मॅक्सवेलनं 49 चेंडूत 78 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान मॅक्सवेलनं तीन षटकार आणि 9 चौकार लगावले.

AB-maxwell

AB-maxwell

 • मॅक्सवेलच्या तुफानी 78 धावा आणि डिव्हिलिअर्स नाबाद 76 धावांच्या बळावर आरसीबीनं चार गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 20 षटकांत 204 धावांचा पाऊस पाडला.

 • 20 षटकानंतर आरसीबीनं चार गड्यांच्या मोबदल्यात 204 धावा केल्या आहेत. कोलकाता संघाला विजयासाठी 205 धावांंचं आव्हानं दिलं आहे.

IPL 2021, RCB vs KKR : मक्सवेल समोरच पडिक्कलने केली त्याची कॉपी (VIDEO)

 • 19 षटकानंतर आरसीबीच्या चार बाद 183 धावा. डिव्हिलिअर्स-कायले जेमिसनची फटकेबाजी

 • मॅक्सवेल बाद झाल्यानंतर सामन्याची सर्व सुत्र डिव्हिलिअर्सनं आपल्या हातात घेतली. कोलकाताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

 • 18 व्या षटकांत डिव्हिलिअर्सनं चोपल्या 18 धावा. रसेलची महागडी गोलंदाजी

 • पॅट कमिन्सच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात मॅक्सवेल बाद झाला. मॅक्सवेलनं 78 धावांची झुंजार खेळी केली. या खेळीदरम्यान चार षटकार लगावले. 17 षटकानंतर आरसीबी चार बाद 148 धावा

 • 16 षटकानंतर आरसीबीनं तीन गड्यांच्या मोबदल्यात 145 धावा केल्या. मॅक्सवेल 77 धावांवर खेळत आहे

 • पहिल्याच षटकात दोन बळी घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीला मॅक्सवेलनं चोपलं. तिसऱ्या षटकांत काढल्या 17 धावा. 15 षटकानंतर आरसीबी तीन बाद 134 धावा. मॅक्सवेल 70 धावांवर खेळत आहे.

 • कमिन्सच्या तिसऱ्या षटकात मॅक्सवेल-डिव्हिलिअर्सनं चोपल्या 11धावा. 14 षटकानंतर आरसीबीच्या तीन बाद 117 धावा

 • 13 षटकानंतर आरसीबीच्या तीन बाद 106 धावा. मॅक्सवेल 63 तर डिव्हिलिअर्स 8 धावांवर खेळत आहेत.

 • 12 वं षटक फेकण्यासाठी आलेल्या प्रसिद्ध कृष्णा यानं आरसीबीला तिसरा धक्का दिला. मोठा फटका मारण्याच्या नादात पडिक्कल सीमारेषेवर झेल देउन माघारी परतला. त्यानं 25 धावांची खेळी केली.

 • 11 षटकानंतर आरसीबीच्या दोन बाद 95 धावा

 • मॅक्सवेल आणि देविदत्त पडिक्कल यांनी आरसीबीचा डाव सावरला. 10 षटकानंतर आरसीबीनं दोन गड्यांच्या मोबदल्यात 84 धावा केल्या आहेत. मॅक्सवेल 55 तर पडिक्कल 19 धावांवर खेळत आहेत.

 • मॅक्सवेलचं लागोपाठ दुसरं अर्धशतक, संघ अडचणीत सापडला असताना मॅक्सवेलनं पुन्हा एकदा फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. 28 चेंडूत झळकावलं अर्धशतक. यादरम्यान त्यानं सात चौकार आणि दोन षटकार लगावले.

 • मॅक्सवेल पडीक्कलनं डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी केली 50 धावांची भागिदारी

 • मॅक्सवेलच्या फटकेबाजीनंतर आरसीबी संघानं पुनरागमन केलं आहे. सात षटकानंतर दोन गड्यांच्या मोबदल्यात केल्या 53 धावा. मॅक्सवेल 30 तर पडिक्कल 14 धावांवर खेळत आहेत.

 • शाकीब अल हसनला धुतलं. सहाव्या षटकांत चोपल्या 17 धावा. मॅक्सवेल पडीक्कलची तुफानी फटकेबाजी. सहा षटकानंतर आरसीबीनं केल्या 45 धावा.

 • आरसबीची खराब सुरुवात, पाच षटकानंतर दोन गड्यांच्या मोबदल्यात केल्या फक्त 28 धावा. मॅक्सवेल आमि पडिक्कल मैदानावर

 • दोन षटकानंतर आरसीबीनं दोन गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा केल्या. पड्डिकल आणि मॅक्सवेल मैदानावर

 • चक्रवर्ती चमकला, आपल्या पहिल्याच षटकात दोघांना केलं बाद. विरट कोहलीनंतर युवा पाटीदार यालाही चक्रवर्तीनं पाठवलं माघारी

 • दुसऱ्याच षटकात आरसीबीला धक्का, कर्णधार विराट कोहली 5 धावांवर माघारी, वरुण चक्रवर्तीनं आपल्या पहिल्या षटकात केलं बाद

 • कोलकाताकडून हरभजन सिंग यानं पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकात खर्च केल्या सहा धावा

 • विराट कोहलीनं मॉर्गनविरोधात पहिल्यांदाच नाणेफेक जिंकली. मॉर्गनने आतापर्यंत सात वेळा नाणेफेक जिंकली. नाणेफेकीनंतर विराटही झाला चकीत

 • विराट कोहलीनं खेळवले फक्त तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू, युवा रजत पाटीदारला दिली संधी

पाहा प्रतिस्पर्धी संघ

 • विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.