esakal | RCB चा सिराज बनतोय 'विराट' मोहरा

बोलून बातमी शोधा

Mohammed Siraj

RCB चा सिराज बनतोय 'विराट' मोहरा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आता बंगळुरुचा प्रमुख गोलंदाज होताना दिसतोय. मोहम्मद सिराजच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने 2-1 असा दिमाखदार विजय नोंदवला होता. आयपीएल 2021 (IPL 2021) च्या यंदाच्या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून लक्षवेधी कामगिरी करत आहे. मागील वर्षी युएईच्या मैदानातही सिराजने उत्तम खेळ केला होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील हंगामात सिराजने पावर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्याने 6.92 च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या होत्या. यापूर्वी त्याच्या गोलंदाजीची आकडेवारी खूपच निराशजनक होती. 2019 मध्ये मोहम्मद सिराजने पावर प्लेमध्ये में 10.14 च्या इकोनॉमीने धावा दिल्या होत्या. यंदाच्या हंगामात त्यात आणखी सुधारणा झालीये. सिराजने पावर प्लेमध्ये 5.50 च्या इकोनॉमीने धावा खर्च करुन संघाला चांगली सुरुवात करुन देण्यात मदत केलीये. 2017 मध्ये त्याने 10, 2018 च्या हंगामात 11, 2019 च्या 7 आणि 2020 च्या हंगामात त्याला 11 विकेट मिळाल्या.

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराजने 27 धावा खर्च करुन 3 विकेट घेतल्या. 4 सामन्यात आता त्याच्या खात्यात 5 विकेट जमा झाल्या आहेत. पावर प्लेमध्ये त्याने जोस बटलर आणि डेविड मिलर यांची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. आतापर्यंतच्या आयपीएलचा विचार करता त्याच्या नावे आता 44 विकेट जमा झाल्या आहेत.