esakal | IPL 2021 : 'यशस्वी' कॅच; नरेनचा खेळ केला खल्लास! (VIDEO)

बोलून बातमी शोधा

Yashasvi Jaiswal

IPL 2021 : 'यशस्वी' कॅच; नरेनचा खेळ केला खल्लास! (VIDEO)

sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021 RR vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात दोन बदलासह उतरला. त्यांचा हा प्रयोगात यशस्वी जयस्वाल आणि जयदेव उनादकट यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळणाऱ्या यशस्वी जयस्वालने शुभमन गिलचा एक कॅच सोडला. यात लगेच सुधारणा करत त्याने सुनील नरेन याचा जबरदस्त कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले. उनादकटच्या गोलंदाजीवर त्याने घेतलेला कॅच अफलातून असाच होता.

क्रीडा क्षेत्रातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

फिल्डिंगमध्ये पहिल्यांदा गडबडल्यानंतर जबऱ्या कॅचमधून त्याने कमबॅक केले. मनन वोहराच्या जागेवर स्थान मिळालेल्या यशस्वी जयस्वालने जोस बटलरसोबत डावाला सुरुवात केली. बटलर बाद झाल्यानंतरही तो मैदानात तग धरुन थांबला. 17 चेंडूत त्याने 22 धावांची खेळी केली. यात त्याने 5 चौकार ठोकले. शिवम मावीने त्याची विकेट घेतली. बॅटिंगमध्ये तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी झाला असला तरी त्याने सुनील नरेनच्या रुपात मोठी विकेट मिळवून देण्यात संघाला मदत केली.