esakal | IPL 2021 Breaking: आजचा बंगळुरू-कोलकाता सामना रद्द!
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021: आजचा बंगळुरू-कोलकाता सामना रद्द!

IPL 2021: आजचा बंगळुरू-कोलकाता सामना रद्द!

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 RCB vs KKR : सध्या सुरू असलेल्या IPLच्या हंगामात आज विराटच्या बंगळुरूचा मॉर्गनच्या कोलकाताशी सामना होणार होता. मात्र हा सामना रद्द करण्यात आला असून सामना आता पुढे ढकलण्यात आला आहे. आता बंगळुरू-कोलकाता सामना कधी खेळवला जाईल, हे IPL व्यवस्थापन लवकरच जाहीर करेल. हा सामना कदाचित काही दिवसांनी खेळवला जाऊ शकतो, असं सांगितलं जात आहे. सामना आज खेळवला जाणार नसल्याची माहिती 'पीटीआय'ने दिली आहे.

कोलकाता संघाचा फिरकीपटू वरूण चक्रवर्ती आणि संदीप वारियर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्याने कोलकाताच्या संघामध्ये काहीसं अस्वस्थ वातावरण आहे. वरूण आणि संदीप यांच्यासोबत असलेल्या इतर खेळाडूंना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कदाचित आजचा सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

IPL ही स्पर्धा बायो-बबलमध्ये खेळवली जाते. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव बायो-बबलमध्ये होणं ही खूपच धक्कादायक गोष्ट मानली जात आहे. "कोलकाताचा वरूण चक्रवर्ती आणि संदीप वारियर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर बंगळुरूच्या संघात काहीशी अस्वस्थता होती. त्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात येणार", असा अंदाज BCCI च्या अधिकाऱ्याने वर्तवला होता. त्यानुसार, अखेर आजचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. कोलकाताचा पॅट कमिन्स याची प्रकृतीदेखील थोडी खराब असल्याची चर्चा आहे. कोलकाताचा शेवटचा सामना दिल्लीसोबत झाला होता.

loading image