esakal | (VIDEO) 'हाऊज द जोश'; बटलरची विक्रमी सेंच्युरी

बोलून बातमी शोधा

Jos Buttler

(VIDEO) 'हाऊज द जोश'; बटलरची विक्रमी सेंच्युरी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राजस्थान रॉयल्सचा ओपनर जोस बटलरने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. विजय शंकरच्या गोलंदाजीवर सिंगल धाव घेत त्याने आयपीएलमधील पहिली सेंच्युरी झळकावली. यासाठी त्याने 56 चेंडूत 10 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार खेचले. आयपीएलमध्ये शतकी खेळी करणारा इंग्लंडचा तो चौता फलंदाज ठरलाय. यापूर्वी जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स आणि केविन पीटरसन यांनी शतकी खेळी केलीय. यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यानेच पहिली सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा यंग ओपनर देवदत्त पदिक्कलने नाबाद शतकी खेळी केली होती. बटलर हा यंदाच्या हंगामात शतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरलाय.

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी यादवला बाद करत राशीद खानने संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि जोस बटलरने 150 धावांची दमदार भागीदारी केली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या संजूला विजय शंकरने अब्दुल समदकरवी झेलबाद केले. त्याने 33 चेंडूत 48 धावांची खेळी केली. जोस बटलर 64 चेंडूत 124 धावा केल्या. यात त्याने 11 चौकार आणि 8 षटकार खेचले. रियान पराग 15 (8) आणि मिलर 7 (3) नाबाद खेळीसह राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 220 धावा केल्या.