IPL मधून माघार घेणाऱ्या जेसन रॉयला ECB नं दिली शिक्षा

England Batsman Jason Roy
England Batsman Jason Royesakal

Jason Roy suspended: इंग्लंडचा स्फोटक सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy) याला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. आयपीएल 2022 च्या हंगामात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते. पण जेसन रॉयने बायो बबलचं कारण देत स्पर्धेतून माघार घेतली होती. ईसीबीने दोन सामन्यांच्या बंदीशिवाय रॉयव 2,500 यूरो इतका दंडही ठोठावला आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी एका निवेदनाच्या माध्यमातून रॉयवर केलेल्या कारवाईसंदर्भातील माहिती दिली. गैरवर्तणुकीमुळे त्याच्यावर कारवाई केली असून त्याने आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही तर ही बंदी 12 महिन्यांची केली जाऊ शकते, असा इशाराही बोर्डाने दिलाय.

England Batsman Jason Roy
मॅक्सवेल-विनीच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट; फोटो व्हायरल

खेळाडूंवर शिस्तभंग समितीने जेसन रॉससंदर्भातील निर्णय घेतला आहे. जेसन रॉयने त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप मान्यही केले आहेत. त्याने जी कृती केली आहे ती अयोग्य आहे. त्याच्या गैरवर्तनामुळे त्याची बदनामी तर होतेच. पण याशिवाय क्रिकेट आणि इंग्लंड बोर्डाचे नावही खराब होते, असे समितीने म्हटले आहे. जेसन रॉयने ईसीबीच्या नियमावलीतील 3.3 च्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये.

England Batsman Jason Roy
'जानी दुश्मनीचा दि एन्ड'; अश्विन-बटलरचं एका फ्रेममध्ये 'रॉयल प्रेम'

आयपीएलच्या मेगा लिलावात जेसन रॉयसाठी गुजरात टायटन्सनं दोन कोटी मोजले होते. बायो बबलचं कारण देत त्याने 15 व्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला होता. याआधीही त्याने 2020 मध्ये असाच निर्णय घेतला होता. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सने त्याला खरेदी केलं होते. यंदाच्या पाकिस्तानमधील पीएसएल 2022 मध्ये तो क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून मैदानात उतरला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com