
IPL 2022 : लखनऊ संघाची 'गरूड' भरारी; लोगो झाला लॉन्च
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग IPL (IPL-2022) च्या पुढील हंगामात यंदा 2 नवीन संघ जोडले जाणार आहेत. यापैकी एक संघ लखनऊ सुपर जायंट्स नावाचा असून ही लखनऊची फ्रँचायझी आहे. या टीमने सोमवारी संघाचा लोगो लॉन्च केला आहे. लखनऊ संघाच्या लोगोमध्ये एक बॅट दिसत आहे, ज्यावर गरुडाच्या आकारात तिरंग्यासोबत पिसे चिकटवण्यात आली असून , फ्रँचायझीचे पूर्ण नाव तळाशी लिहिलेले आहे.
लखनऊ सुपर जायंट्स संघाने एक व्हिडिओ क्लिप देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये एक चेंडू तलवारीसारखी धार असलेल्या अग्निमय बॅटला स्पर्श करतो. लोगोमध्ये मध्यभागी एक चेंडू असलेली बॅट आहे. फ्रँचायझीचे पूर्ण नाव तळाशी लिहिलेले आहे जे निळ्या रंगात आहे. फ्रँचायझीचा लोगो प्राचीन भारतातील पौराणिक कथांपासून प्रेरित असल्याचे एका संदेशात सांगण्यात आले आहे. यामध्ये गरुड हा पक्षी - ज्याचा हवेतील वेग सर्वात वेगवान मानला जातो, तो बसला आहे. गरुडाने आम्हाला संघाचे पंख असलेले प्रतीक बनवण्याची प्रेरणा दिली आहे.
केएल राहूल असणार कर्णधार
केएल राहुल हा लखनऊ संघाचा कर्णधार असणार असून, जो तब्बल 17 कोटी रुपयांना बोलीवर संघाशी जोडला गेला आहे. यापूर्वी तो पंजाब किंग्जचे नेतृत्व करत होता. राहुल हा आयपीएलचा आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू आहे, ज्याने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत भारतीय संघाची धुरा सांभाळली आहे.
Web Title: Ipl 2022 Lucknow Super Giants New Logo Launched With Tri Color
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..