IPL 2022 : मेगा लिलाव अन् खेळाडूंच्या रिटेन संदर्भात सर्व काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL New Team Bid
IPL 2022 : मेगा लिलाव अन् खेळाडूंच्या रिटेन संदर्भात सर्व काही

IPL 2022 : मेगा लिलाव अन् खेळाडूंच्या रिटेन संदर्भात सर्व काही

ipl 2022 mega auction and player retention : आयपीएलच्या मेगा लिलावासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. 2022 च्या हंगामातील संघ बांधणीसाठी होणारी मेगा लिलाव प्रक्रिया डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पार पडण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने अधिकृतरित्या अद्याप यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. मेगा लिलावापूर्वी आठ फ्रेंचायझींना प्रत्येकी 4 खेळाडू रिटेन करता येणार आहे. या सर्व संघ मालकांना 30 नोव्हेंबरला कोणते खेळाडू रिटेन करणार याची यादी बीसीसीआयला द्यावी लागणार आहे.

विद्यमान आठ संघासह आगामी हंगामात नवे दोन संघ मैदानात उतरणार आहेत. बीसीसीआयने 25 आक्टोबरला नव्या संघांची घोषणा केली होती. लखनऊ आणि अहमदाबाद नव्याने स्पर्धेत उतरतील. लखनऊ टीमची मालकी आरपीएसजी ग्रुपकडे आहे. तर इरेलिया कंपनीने अहमदाबाद संघासाठी 5625 कोटी मोजले आहेत. लिलावापूर्वी लखनऊ आणि अहमदाबाद या दोन संघांना प्रत्येकी तीन खेळाडू करारबद्ध करु शकतात. 1 ते 25 डिसेंबरच्या दरम्यान या दोन नव्या फ्रेंचायझींना खेळाडूंसोबत करार करता येईल.

कोणते संघ कोणत्या खेळाडूंना करु शकतात रिटेन

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, केरॉन पोलार्ड आणि इशान किशन

चेन्नई सुपर किंग्ज : एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, रविंद्र जाडेजा आणि मोइन अली किंवा सॅम कुरेन.

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल.

कोलकाता नाइट रायडर्स : व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती.

पंजाब किंग्ज : प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, गत हंगामात पंजाब किंग्जचे नेतृत्व करणारा लोकेश राहुल नव्या फ्रेंचायझीकडून खेळणार असल्याची चर्चा आहे. त्याच्या या निर्णयानंतर पंजाबने एकाही खेळाडू रिटेन करायचे नाही असे ठरवल्याचे बोलले जात आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली आणि ग्लॅन मॅक्सवेल.

राजस्थान रॉयल्स : राजस्थानने संजू सॅमसनसाठी 14 कोटी मोजून त्याला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिटेन होणारा तो पहिलाच खेळाडू ठरलाय. जोस बटलर, यशस्वी जयस्वाल यांचीही नावे चर्चेत आहेत. जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यापैकी एकजण रिटेन होऊ शकतो.

सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यमसनच्या रुपात हैदराबादकडून केवळ एक खेळाडू रिटेन केला जाऊ शकतो. दुसऱ्या नावाचा विचार झाला तर राशिद खानचा नंबर लागू शकतो.

रिटेन होणाऱ्या खेळाडूंची सॅलरी कॅप

रिटेन होणाऱ्या पहिल्या खेळाडूसाठी - 16 कोटी

रिटेन होणाऱ्या दुसऱ्या खेळाडूसाठी - 12 कोटी

रिटेन होणाऱ्या तिसऱ्या खेळाडूसाठी - 8 कोटी

रिटेन होणाऱ्या चौथ्या खेळाडूसाठी - 6 कोटी

जर एखाद्या फ्रेंचायझीनं तीनच खेळाडू रिटेन केले तर...

पहिल्या खेळाडूला - 15 कोटी

दुसऱ्या खेळाडूला - 11 कोटी

तिसऱ्या खेळाडूला - 7 कोटी

जर एखाद्या फ्रेंचायझीने 2 खेळाडू रिटेन केले तर...

पहिल्या खेळाडूला - 14 कोटी

दुसऱ्या खेळाडूला - 10 कोटी

जर एक खेळाडू रिटेन केला तर त्या खेळाडूला - 14 कोटी

फ्रेंचायझींच्या पर्समधील रक्कम

बीसीसीआयने सर्व फ्रेंचायझींना खेळाडूंची खरेदी करण्यासाठी 90 कोटींची मर्यादा दिली आहे. यापेक्षा अधिक रक्कम फ्रेंचायझींना खर्च करता येणार नाही.

टॅग्स :IPL 2022IPL 2022 auction