VIDEO : रितिका रिलॅक्स मोडवर; कारण लेक रोहितच्या कडेवर

rohit sharma with daughter samaira
rohit sharma with daughter samaira Sakal

IPL 2022: भारतीय संघातील खेळाडू राष्ट्रीय ड्युटीची जबाबदारी पार पाडून आता आयपीएलसाठी सज्ज झाले आहेत. भारतीय संघातील खेळाडू आपापल्या फ्रँचायझी संघाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. स्पर्धेत सर्वाधिक 5 ट्रॉफ्या जिंकून विक्रम प्रस्थापित करणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)आपल्या कुटुंबियांसह मंगळवारी मुंबईत असलेल्या टीमला जॉइन झाला.

हॉटेलमध्ये प्रवेश करताना रोहितसह त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा यांची खास झलक पाहायला मिळाली. रोहितनं आपल्या लेकीला कडेवर घेऊन हॉटेलमध्ये प्रवेश केला. मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात रोहित मुंबईच्या ट्रायडेंट बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पोहचल्याचे दिसते. याठिकाणी पोहचल्यानंतर रोहित आपल्या मुलीला ट्रॉफी दाखवताना दिसले. मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये ज्या पाच ट्रॉफ्या जिंकल्या आहेत. त्या याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.

rohit sharma with daughter samaira
VIDEO : राजस्थानची स्टंटबाजी; जर्सी लॉन्च करण्याचा नवा फंडा

लेकीला ट्रॉफी दाखवल्यानंतर रोहित शर्मा पत्नी रितिका सजदेहसह आपल्या रुमकडे निघून गेला. आयपीएलच्या नियमावलीनुसार हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर सर्वांना तीन दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. ते आपल्या रुममधून बाहेर पडू शकणार नाहीत. कर्णधार रोहित शर्माआधी संघाचे मुख्य कोच महेला जयवर्धने क्वारंटाइन झाले आहेत. 26 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स 27 मार्चला ब्रेबोर्न स्टेडियमवरुन दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्याने आयपीएल स्पर्धेला सुरुवात करेल.

rohit sharma with daughter samaira
स्मृती मानधनाच्या अफेअरची चर्चा, म्युझिक डायरेक्टरला करतीये डेट?

विराट कोहलीने भारतीय संघाची कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहित शर्माने त्याची जागा घेतलीय. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्माने पहिल्यांदा टी-20 त्यानंतर वेस्ट इंडीज विरुद्ध वनडे आणि श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतही भारतीय संघाचे पूर्ण वेळ नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्यांना क्लिन स्विप दिली. आता आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com