IPL मध्ये जेवढा पैसा ओतला जातो तेवढा पाकिस्तानचा GDP तरी आहे का?

IPL vs PSL
IPL vs PSLSakal News

भारतात आयपीएलच्या मेगा लिलावाची (IPL 2022 Mega Auction) जय्यत तयारी सुरु असताना पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) स्पर्धेचा थरार रंगला आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या सातव्या हंगामाच्या दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने मोठ वक्तव्य केले आहे. आयपीएलनंतर (IPL) पाकिस्तान प्रिमीयर लीग (PSL) क्रिकेट जगतातील दोन नंबरची सर्वोत्तम टी-20 लीग असल्याचे त्याने म्हटले आहे.

मायकल वॉन (Michael Vaughan) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान प्रिमीयर लीग (PSL) आणि इंडियन प्रिमीयर लीग (IPL) स्पर्धेची तुलना केली आहे. पाकिस्तानमध्ये रंगणारी टी-20 लीग सर्वोत्तम असून आयपीएलप्रमाणेच ती जगातील सर्वोत्तम स्पर्धे असल्याचा उल्लेख मायकल वॉन याने केला आहे.

मायकल वॉन नेहमीच भारतीय चाहत्यांना खटकणारी वक्तव्य करत असतो. या विधानानंतर तो पुन्हा भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. मायकल वॉनच्या या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्याची शाळा घेतली आहे. आयपीएल मधील आर्थिक उलाढाल ही पाकिस्तानच्या ‘सकल राष्ट्रीय उत्पादन’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) GDP पेक्षा अधिक आहे, असा शब्दांत भारतीय चाहत्यांनी मायकल वॉनला फटकारले आहे.

PSL चा इतिहास

आयपीएलनंतर जवळपास 8 वर्षानंतर पीएसल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. पहिल्या हंगामात या स्पर्धेत केवळ पाच संघ सहभागी होते. इस्लामाबाद युनाइटेड संघाने पहिले जेतेपद पटकावले होते. 2018 मध्ये या स्पर्धेत 6 टीम सहभागी झाल्या. इस्लामाबाद युनाइटेडनं ही स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे. याशिवाय पेशावर जालमी, क्ववेट ग्लेडियेटर आणि मुल्तान सुल्तान संघाने प्रत्येकी एकदा स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.

IPL vs PSL
IPL 2022 Player Mega Auction : फ्रेंचायझीसाठी BCCI ची नियमावली

आयपीएलचा विचार केला तर 2008 पासून ही स्पर्धा होत आहे. 15 व्या हंगामात स्पर्धेत आणखी रंगत पाहायला मिळणार आहे. आगामी हंगामात आयपीएलमध्ये एकूण 10 संघ मैदानात उतरताना दिसतील. त्यामुळेच पीएसएल लीग भारतीय लीगला टक्कर देण्यास सक्षम असल्याचं मायकल वॉनचं मत भारतीय क्रिकेट चाहत्यांना खटकलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com