बेयरस्टोची शतकी खेळी; प्रितीच्या गालावर पडली असेल खळी

Punjab Kings England Jonny Bairstow
Punjab Kings England Jonny Bairstow Sakal

ऑटिंगा : वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जॉनी बेयरस्टोनं (Jonny Bairstow) संघाची लाज राखली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरले. धावफलकावर अवघ्या 48 धावा असताना इंग्लंडने चार विकेट गमावल्या होत्या. जॉनी बेयरस्टोनं या कठिण परिस्थितीतून संघाला बाहेर काढले. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने खराब सुरुवातीनंतर दमदार कमबॅक केल. पाहुण्या संघाने दिवसाअखेर 6 बाद 268 धावा केल्या होत्या.

ऑलराउंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि बेयरस्टो यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी 67 धावांची महत्त्व भागीदारी केली. स्टोक्स 95 चेंडूत 36 धावा करुन बाद झाला. त्यानंतर बेयरस्टोनं विकेटकीपर फलंदाज बेन फोक्सच्या साथीने 99 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने 200 पार मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी जॉनी बेयरस्टोनं 216 चेंडूत 9 चौकाराच्या मदतीने नाबाद 109 धावा केल्या होत्या. क्रिस वोक्ससोबत त्याने 54 धावांची भागीदारी केलीये. वोक्स 24 धावांवर नाबाद खेळतोय. वेस्ट इंडीज कडून जेसन होल्डरने 16 षटकात 15 धावा देत 2 विकेट घेतल्या. त्याने तब्बल 9 षटके निर्धाव टाकली.

बेयरस्टोची सेंच्युरी प्रिती झिंटाच्या पंजाबसाठी 'अच्छे दिन'चे संकेत देणारी

वेस्ट इंडीजच्या मैदानात जॉनी बेयरस्टोनं साजरी केलेली दमदार सेंच्युरीही पंजाबसाठीही खास अशीच आहे. कारण आयपीएलच्या मेगा लिलावात पंजाबने त्याच्यावर मोठा डाव खेळला होता. प्रिती झिंटाच्या पंजाबने त्याच्यासाठी तब्बल 6. 75 कोटी मोजले आहेत. 26 मार्च 2022 पासून आयपीएलचे बिगूल वाजणार आहे. आंतरराष्ट्रीय दौरा आटोपून अनेक परदेशी खेळाडू आपापल्या फ्रँचायझी संघाला जॉईन होतील. पंजाबचा संघ 27 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्याने स्पर्धेला शुभारंभ खेळेल. यंदाच्या स्पर्धेत जॉनी बेयरस्टो पंजाबचे ट्रम्प कार्ड ठरु शकतो. त्यामुळेच त्याची शतकी खेळी प्रिती झिंटाच्या गालावर खळी फुलवणारी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com