२ एप्रिलला खेळला जाईल आयपीएल २०२२चा पहिला सामना! ‘या’ देशात होणार सामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL Cricket

IPL 2022 : २ एप्रिलला खेळला जाईल आयपीएल २०२२चा पहिला सामना!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सर्वांना प्रतीक्षा असते. प्रेक्षकांनाच काय खेळाडूची या लीगची वाट पाहत असतात. कारण, यानिमित्त खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलवर (IPL 2022) चेन्नई सुपर किंगने आपले नाव कोरले. आता २०२२च्या आयपीएलची प्रतीक्षा असताना वेळापत्रक जाहीर (Schedule Date) झाल्याचे समजते. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची तयारी सुरू झालेली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेचे वेळापत्रक बीसीसीआयने निश्चित केल्याचे वृत्त आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात परतणार हे लक्षात घेण्यासारखे आहे. शेवटचे दोन आयपीएल यूएईमध्ये खेळले गेले. भारतातील कोविडच्या वाईट परिस्थितीमुळे ही स्पर्धा भारताबाहेर घ्यावी लागली होती. आता ही स्पर्धा भारतात परतणार आहे, हे विशेष...

हेही वाचा: हॉट अभिनेत्री मीरा जगन्नाथचे सेक्सी पोझ बघितले का?

२००८ मध्ये पहिल्यांदा आयपीएलला सुरुवात झाली. तेव्हापासून २०२१ पर्यंत खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये फक्त ८ संघ खेळले आहेत. मात्र, बीसीसीआयने संघाची संख्या आठवरून दहा करण्याचा निर्णय घेतला. दोन नव्या संघांच्या नावाची घोषणाही झाली आहे. यामुळे २०२२ मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच दहा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. अहमदाबाद व लखनौ असे दोन नवीन संघांचे नाव आहेत.

प्राप्त बातमीवर विश्वास केला तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२२ च्या तारखा निश्चित केल्या आहेत. या स्पर्धेचा पहिला सामना २ एप्रिल रोजी चेन्नई येथे खेळला जाईल. यावेळी स्पर्धेत दहा संघ खेळणार असल्याने एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना जूनच्या पहिल्या आठवड्यात खेळवला जाईल.

हेही वाचा: ...अन् मध्यरात्री आईला मुलगी प्रियकरासोबत दिसली नको त्या अवस्थेत

लिलाव डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात

प्राप्त माहितीनुसार, आयपीएल २०२२चा मेगा लिलाव डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतो. हा लिलाव चेन्नईत होणार आहे. जुन्या खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत संघ जास्तीत जास्त चार खेळाडू राखू शकतात. यामध्ये दोनपेक्षा जास्त परदेशी खेळाडू असू शकत नाहीत. संघांना ३० नोव्हेंबरपर्यंत आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडे राखून ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे.

loading image
go to top