आयपीएलमध्ये दिसणार बॉलिवूडची जोडी; खरेदी करणार संघ?

रणवीर-दीपका
रणवीर-दीपकारणवीर-दीपका

मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेटचे जुने नातं आहे. दोन्ही एकमेकांशी जुळलेले आहे. अनेक बॉलिवूड तारकांनी प्रसिद्ध क्रिकेटरांशी लग्नगाठ बांधली आहे. यात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी नवीन आहे. अनेक बॉलिवूडचे सितारे क्रिकेटचा सामना बघण्यासाठी मैदान गाठत असतात. यावरून क्षेत्रांचे संबंध किती घट्ट आहे हे दिसून येते.

बॉलिवूडची डिम्पल गर्ल प्रीती झिंटा आणि किंग खान शाहरूखने आयपीएलला सुरुवात झाली तेव्हापासून संघ खरेदी केले आहे. यामुळे हे संबंध अधिकच घट्ट झाले आहे. आता रणवीर-दीपकाच्या जोडीने आयपीएलचा संघ खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. रणवीर-दीपिका पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी संघ खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

रणवीर-दीपका
भांडण आले अंगावर; बापलेकाच्या भांडणात शेजाऱ्याची हत्या

२०२२ मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये दोन नवीन संघ येणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. यामुळे अनेकजण संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. यात मॅंचेस्टत युनायटेड सारख्या फुटबॉल संघाचा समावेश असल्याची माहिती आहे. हे गोष्ट किती खरेदी आहे, हे येणारा काळच सांगणार आहे.

दोन नवीन संघ कोणते राहतील, त्यांची नाव काय असतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, दोन संघ येणार आहे, हे मात्र नक्की. यासाठी लिलावही पार पडणार आहे. यामुळे जुन्या संघांमध्ये मोठे फेरबदल होतील, हे नक्की. नवीन संघ खरेदी करण्यासाठी कलाकार, व्यावसायिक उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. यात रणवीर आणि दीपिका यांचाही समावेश आहे. त्यांनी यासाठी बीसीसीआयकडे अर्जही केल्याचे समजते.

रणवीर-दीपका
...अन् पतीने फोडला हंबरडा; अपघातात गर्भवतीसह बाळाचा अंत

आयपीएलमध्ये अनेक बॉलिवूड सितारे

आयपीएल आणि बॉलिवूडचे दीर्घकालीन संबंध आहे. शाहरुख खान व जुही चावला हे कोलकाता नाइट रायडर्स संघाचे मालक आहेत तर राज आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांनी सुरुवातीला राजस्थान रॉयल्समध्ये गुंतवणूक केली होती. प्रीती झिंटा पंजाब किंग्जची सह-मालक आहे. आता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण आयपीएल संघ खरेदी करण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे या यादीत त्यांचे नाव जुळले तर कोणालाही नवल वाटायला नको.

चित्रपटामुळे झाले असावे प्रेरित

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा पुढचा चित्रपट क्रिकेटवर आधारित आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘८३’मध्ये रणवीर कपिल देवची भूमिका साकारणार आहे. तर दीपिका त्याची पत्नी रोमी भाटिया यांच्या भूमिकेत असेल. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात क्रिकेटरची भूमिका साकारल्याने ते संघ खरेदीसाठी प्रेरित झाले असावे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com