IPL 2023 Auction Live : लिलावावर विदेशी खेळाडूंचा दबदबा; काही भारतीयांचेही उघडले नशीब

IPL 2023 Auction Live Update
IPL 2023 Auction Live UpdateESAKAL

IPL 2023 Auction Live Update : आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात पहिल्या 30 मिनिटातच मोठा धमाका झाला. इंग्लंडचा सॅम करन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला 18.5 कोटी रूपयांना पंजाब किंग्जने आपल्या गोटात खेचले. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीवर मुंबई इंडियन्सने 17.5 कोटी रूपयांची बोली लावली. या मोठ्या बोलीचा धुरळा अजून खाली बसतो न बसतो तोच चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्सला 16.25 कोटी रूपये बोली लावत अजून एक धमाका केला.

जो रूट : 1 कोटी

पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिलेला जो रूटला अखेर फ्रेंचायजी मिळाली. त्याला राजस्थान रॉयल्सने 1 कोटी रूपयांना घेतले.

40 वर्षाच्या अमित मिश्राला लागली 50 लाख बोली

आयपीएल 2023 च्या लिलावातील सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून अमित मिश्राने सहभाग नोंदवला होता. त्याला लखनौ सुपर जायंट्सने 50 लाख बेस प्राईसला खरेदी केले.

कायल जेमिसन 1 कोटी 

न्यूझीलंडचा उंचपुरा वेगवान गोलंदाज कायल जेमिसनला चेन्नई सुपर किंग्जने 1 कोटीला खरेदी केले.

मोहम्मद नवी अनसोल्ड

अफगाणिस्तानचा कर्णधार आणि फिरकी अष्टपैलू मोहम्मद नबी यंदाच्या लिलावात अनसोल्ड राहिला.

मनिष पांडे 2.4 कोटी 

मनिष पांडेला दिल्ली कॅपिटस्लने 2.4 कोटी रूपयाला खरेदी केले.

मुकेश कुमार 5.50 कोटी

मुकेश कुमारसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांनी जोरदार बॅटिंंग केली. अखेर दिल्ली कॅपिटल्सने त्याला 5.50 कोटीत खरेदी केले.

शिवम मावी 6 कोटी 

भारतीय अनकॅप्ट खेळाडू सुरू झाल्यानंतर फ्रेचायजींनी आखडता हात घेतला होता. मात्र अखेर शिवम मावीसाठी चुरशीने बोली लागवण्यात आली. अखेर गुजरात टायटन्सने शिवम मावीला तब्बल 6 कोटी रूपये खर्चून खरेदी केले.

जगदीशन 90 लाख 

विजय हजारे ट्रॉफीत पाच शतके ठोकणाऱ्या नारायण जगदीशनला केकेआरने 90 लाखाला विकत घेतले. नारायण जगदीशनने लिस्ट A च्या सामन्यात सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम केला होता. त्याने विजय हजारे ट्रॉफीत 141 चेंडूत 277 धावा ठोकल्या होत्या.

स्पिनर्स अनसोल्ड

फिरकीपटू अॅडम झाम्पा, शाम्सी, मुजीब हे सर्व पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिले.

इशांत शर्मा 50 लाख

दिल्ली कॅपिटल्सने भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला 50 लाख या बेस प्राईसला खरेदी केले.

आदील राशीद 2 कोटी 

इंग्लंडचा अव्वल दर्जाचा लेग स्पिनर आदिल राशीदला सनराईजर्स हैदराबादने 2 कोटींनी खरेदी करत आपल्या कळपात सामील करून घेतले. राशीद स्वस्तात हाताला लागल्याने काव्या मारची कळी खुलली होती.

जयदेव उनाडकट 50 लाख

12 वर्षानंतर भारतीय कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या जयदेव उनाडकटला लखनौ सुपर जायंट्सने बेस प्राईस 50 लाखाला खरेदी केले.

क्लासेन   5.25 कोटी  

सनराईजर्स हैदराबादने क्लासेनला 5.25 कोटी ला खरेदी केले.

निकोलस पूरन 16 कोटी

निकोलस पुरनला लखनौ सुपर जायंटने 16 कोटी रूपयाला खरेदी केले.

बेन स्टोक्स 16.25 कोटी

बेन स्टोक्ससाठी लखनौ सुपर जायंट आणि सनराईजर्स हैदराबादने बोली लावण्यास सुरूवात केली. त्यांनी इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराला 15 कोटींपर्यंत नेले. त्यानंतर चेन्नईने लिलावात उडी घेतली. अखेर सीएसकेने 16.25 कोटीला त्याला खरेदी केले.

कॅमेरून ग्रीन 17.50 कोटी 

ऑस्ट्रेलियाचाअष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनसाठी पहिल्यापासूनच आक्रमकपणे बोली लावली जात होती. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सने त्याला 15 कोटींपर्यंत पोहचवले. दिल्ली आणि मुंबईमध्येच त्याला आपल्या गोटात खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर मुंबई इंडियन्सने त्याला 17.50 कोटीला आपल्या गोटात खेचले.

सॅम करन  18.50 कोटी

सॅम करनसाठी राजस्थान आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस निर्माण झाली होती. राजस्थान 11 कोटीपर्यंत पोहचल्यानंतर सीएसकेने लिलावात उडी घेतली. मात्र लिलाव रंगात आला असताना पंजाब किंग्जने लिलावात उडी घेत सॅम करनला आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू केले. मुंबईनेही बोली लावत सॅमचा भाव वाढवला. अखेर पंजाबने 18.50 कोटीला सॅम करनला आपल्या गोटात खेचले.

जो रूट अनसोल्ड

अजिंक्य रहाणे 50 लाख 

सीएसकेने वाचवली माजी उपकर्णधाराची लाज, बेस प्राईस 50 लाखाला केले खरेदी

मयांक अग्रवाल 8.25 कोटी 

मयांकसाठी हैदाराबादने खर्च केले 8.25 कोटी रूपये.

हॅरी ब्रुक 13.25 कोटी

बेस प्राईस 1.50 कोटी रूपये असलेला हॅरी ब्रुकला आपल्या गोटात घेण्यासाठी हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रस्सीखेच सुरू होती. यामध्येच ब्रुक 10 कोटींच्या पार पोहचला. अखेर हैदराबादने त्याला 13.25 कोटी रूपयाला खरेदी केले. पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी मालिकेत ब्रुकने शतकांचा पाऊस पाडला होता. त्याने आक्रमक पद्धतीने फलंदाजी करत ही शतके ठोकली.

आयपीएल 2023 लिलावाला सुरूवात 

आयपीएल 2023 च्या लिलावाला सुरूवात झाली.

कोणाच्या पर्समध्ये किती कोटी?

CSK : 20.45 कोटी, 7 जागा शिल्लक

DC : 19.45 कोटी, 5 जागा शिल्लक

GT : 19.25 कोटी, 7 जागा शिल्लक

KKR : 7.05 कोटी 11 जागा शिल्लक

LSG : 23.35 कोटी 10 जागा शिल्लक

MI : 20.55 कोटी 9 जागा शिल्लक

PBKS : 32.2 कोटी 9 जागा शिल्लक

RCB : 8.7 कोटी 7 जागा शिल्लक

RR : 13.2 कोटी 9 जागा शिल्लक

SRH : 42.25 कोटी 13 जागा शिल्लक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com