IPL 2023 Auction : मॉरिसपेक्षा मोठी लॉटरी लागणार; आज सर्वाधिक बोलीचं रेकॉर्ड मोडलं जाणार?

IPL 2023 Auction Most expensive players
IPL 2023 Auction Most expensive playersesakal

IPL 2023 Auction Most expensive players : यंदाच्या आयपीएल लिलावात एकूण 405 खेळाडू भाग घेणार आहेत. यातील 273 भारतीय आणि 132 विदेशी खेळाडू आहेत. यातील कॅप्ट खेळाडू हे 119 तर 282 अनकॅप्ट खेळाडू आहेत. याचबरोबर 4 असोसिएट देशाचे खेळाडू या लिलावात भाग घेणार आहेत. जरी हा लिलाव मिनी लिलाव असला तरी जागतिक स्तरावरील अनके मोठे खेळाडू, अष्टपैलू खेळाडू या लिलावात हॅमरखालून जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठी बोली लागू शकते. या लिलावात ख्रिस मॉरिसचा सर्वाधिक 16.25 कोटी रूपये बोली लागण्याचा विक्रम कोण मोडेल याची देखील उत्सुकता असणार आहे. त्यामुळे आज आपण आयपीएल एतिहासातील काही छप्पर फाड के बोली लागलेले खेळाडू पाहणार आहोत.

IPL 2023 Auction Most expensive players
IPL 2023 Auction: काव्या, सुहाना अन् प्रिती... लिलावावेळी कॅमेरा नुसता भिरभिरणार

ख्रिस मॉरिस

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला 2021 च्या लिलावात तब्बल 16.25 कोटींची लॉटरली लागली होती. ही आयपीएल इतिहासातील आतापर्यंतची सर्वोच्च बोली ठरली. राजस्थानने हा रॉयलपणा दाखवला होता. मात्र मॉरिसने पुढच्याच हंगामात आयपीएलमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

युवराज सिंग

भारताचा शैलीदार डावखुरा फलंदाज युवराज सिंगला 2015 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने 16 कोटी रूपये खर्चून खरेदी केले होते. त्यावेळी ही बोली आयपीएलमधील सर्वोच्च बोली ठरली होती.

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला 2020 च्या लिलावात केकेआरने 15.5 कोटी रूपये खर्चून खरेदी केले होते. मात्र आयपीएळ 2022 मध्ये केकेआरने कमिन्सला रिलीज केले. त्यानंतर केकेआरने 2022 च्या लिलावात त्याला 7.25 कोटीला खरेदी केले.

इशान किशन

मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज इशान किशनला 2022 मध्ये मोठी लॉटरी लागली होती. त्याची बोली 15.25 कोटींपर्यंत गेली. मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या कळपात सामील करून घेतले.

काईल जेमिसन

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन देखील आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर 15 कोटींपर्यंत पोहचला. त्याला 2021 मध्ये आरसीबीने आपल्या गोटात खेचले.

बेन स्टोक्स

इंग्लंडचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला राईजिंग पुणे सुपर जायंटने 14.5 कोटी रूपये देत आपल्या संघात सामील केले होते. मात्र हा संघ पुढे आयपीएलमधून बाहेर गेला.

दीपक चाहर

भारताचा वेगवान गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज दीपक चाहलने देखील आयपीएल लिलावात कहर केला होता. 2022 च्या लिलावात सीएसकेने त्याला 14 कोटी रूपये खर्चून पुन्हा आपल्या संघात आणण्यात यश मिळवले होते. मात्र त्याला दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम खेळता आला नव्हता.

IPL 2023 Auction Most expensive players
IPL 2023 Auction: दोन परदेशी खेळाडूसाठी MI अन् CSK मध्ये जुंपणार ?

IPL 2023 : कोणाच्या पर्समध्ये किती कोटी

CSK : 20.45 कोटी, 7 जागा शिल्लक

DC : 19.45 कोटी, 5 जागा शिल्लक

GT : 19.25 कोटी, 7 जागा शिल्लक

KKR : 7.05 कोटी, 11 जागा शिल्लक

LSG : 23.35 कोटी, 10 जागा शिल्लक

MI : 20.55 कोटी, 9 जागा शिल्लक

PBKS : 32.2 कोटी, 9 जागा शिल्लक

RCB : 8.7 कोटी, 7 जागा शिल्लक

RR : 13.2 कोटी, 9 जागा शिल्लक

SRH : 42.25 कोटी, 13 जागा शिल्लक

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com