IPL 2023 Harry Brook: लिलावाचा नारळ हॅरी ब्रुकने फुटला 13.25 कोटीला; पाकिस्तान मध्ये घातला होता धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023 Harry Brook

IPL 2023 Harry Brook: लिलावाचा नारळ हॅरी ब्रुकने फुटला 13.25 कोटीला; पाकिस्तान मध्ये घातला होता धुमाकूळ

IPL 2023 Auction Harry Brook Price : आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी मिनी-लिलावात एका खेळाडूवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव करण्यात आला. या 23 वर्षीय इंग्लंडच्या फलंदाज हॅरी ब्रूकला सनरायझर्स हैदराबादने तब्बल 13 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतले आहे.

बेस प्राईस 1.50 कोटी रूपये असलेला हॅरी ब्रुकला आपल्या गोटात घेण्यासाठी हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रस्सीखेच सुरू होती. यामध्येच ब्रुक 10 कोटींच्या पार पोहचला. अखेर हैदराबादने त्याला 13.25 कोटी रूपयाला खरेदी केले. पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी मालिकेत ब्रुकने शतकांचा पाऊस पाडला होता. त्याने आक्रमक पद्धतीने फलंदाजी करत ही शतके ठोकली.

हॅरी ब्रूक हा इंग्लंड क्रिकेट संघाकडून खेळतो. तो इंग्लंडच्या अंडर-19 संघाचा कर्णधार राहिला आहे. 2018 मध्ये त्याने पहिले प्रथम श्रेणी शतकही झळकावले. 2018 मध्ये त्याने अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत इंग्लिश संघाचे नेतृत्वही केले, जिथे तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. ब्रूक त्याच्या आक्रमक वृत्तीसाठी प्रसिद्ध आहे.

उजव्या हाताचा फलंदाज हॅरी ब्रूकने आतापर्यंत चार कसोटी, 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर तीन शतके आणि 1 अर्धशतकाच्या मदतीने कसोटीत 480 धावा आहेत. सध्या कसोटीतच त्याची सरासरी 80 आहे. याचबरोबर ब्रूकने अर्धशतकाच्या मदतीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 372 धावा केल्या आहेत. त्याच्या एकूण टी-20 कारकिर्दीत त्याने 99 सामन्यांत 2432 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 3547 धावा करण्यासोबतच त्याने 8 विकेट्सही घेतल्या आहेत.

टॅग्स :IPL