IPL 2023 Auction: बेन स्टोक्स धोनीची जागा घेणार? मिस्टर आयपीएलचा मोठा दावा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ipl 2023 auction will ben stokes replace ms dhoni

IPL 2023 Auction: बेन स्टोक्स धोनीची जागा घेणार? मिस्टर आयपीएलचा मोठा दावा...

IPL 2023 Auction Will Ben Stokes Replace MS Dhoni : कोची येथे आयपीएल 2023 चा लिलाव सुरू आहे. या हंगामाच्या लिलावात इंग्लंडच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. लिलावात चेन्नई सुपर किंग्जने इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराला 16.25 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. यानंतर मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाने मोठा दावा केला आहे. चेन्नई सुपर किंग्ज बेन स्टोक्सकडे कर्णधारपद सोपवू शकते, असे रैनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Sam Karan: चेन्नईमधून पंजाबमध्ये जाताच सॅम करनचे ट्विट व्हायरल...

लिलावादरम्यान तज्ज्ञ म्हणून बसलेल्या सुरेश रैनाने सांगितले की, चेन्नई सुपर किंग्जने भविष्याचा विचार करून बेन स्टोक्सला विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई स्टोक्सकडे कर्णधारपद सोपवू शकते असेही त्याने सांगितले. चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्सला 16.25 कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या संघात समाविष्ट केले आहे. बेन स्टोक्सची आयपीएलमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे. यापूर्वी 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सने 14.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. एकेकाळी तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होता.

हेही वाचा: IPL 2023 Auction : जम्मूच्या विवरांतवर पदार्पणातच 2 कोटींची बोली; 'या' अनकॅप्ट खेळाडूंनी लिलाव गाजवला

आयपीएल 2023 च्या लिलावात आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जने निशांत संधूला 60 लाख रुपयांना, शेख रशीदला 20 लाख रुपयांना, अजिंक्य रहाणेला 50 लाख रुपयांना आणि बेन स्टोक्सला 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. फ्रँचायझीकडे आता फक्त 2.90 कोटी रुपये शिल्लक आहेत.

हेही वाचा: Sam Karan: चेन्नईमधून पंजाबमध्ये जाताच सॅम करनचे ट्विट व्हायरल...

याशिवाय इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक 13.25 कोटी रुपयांना विकला गेला. हॅरी ब्रूकला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले. इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या लिलावामध्ये पंजाब किंग्सने इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर सॅम करनला 18.50 कोटी रुपयांच्या मोठ्या किमतीत सामील केले आहे. तर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठी लढत झाली, ज्यामध्ये मुंबईने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि त्यांना सामील होण्यासाठी 17.50 कोटी रुपये खर्च केले.