IPL 2023 : आयपीएल महोत्सव आजपासून! १० संघ, ५२ दिवस आणि ७० सामन्यांची साग्रसंगीत मेजवानी

१० संघ, ५२ दिवस आणि ७० सामन्यांची साग्रसंगीत मेजवानी
IPL 2023
IPL 2023 sakal

अहमदाबाद : क्रिकेटविश्वातील खेळाडूंसाठी आणि जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींसाठी सर्वांत उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएलचा १६ वा हंगाम आजपासून सुरू होत आहे. गतवर्षी सांगता झालेल्या भव्यदिव्य अशा नरेंद्र मोदी स्टेडियमवर यंदाच्या मोसमाचा श्रीगणेशा होईल आणि आयपीएल महोत्सवाचे बिगुल वाजेल. १० संघ ५२ दिवस आणि ७० सामन्यांची मेजवानी ३१ मार्च ते २८ मे या कालावधीत मिळणार आहे.

कोरोनामुळे गेली तीन वर्षे गणित बिघडलेली आयपीएल यंदापासून मूळ पदावर येत आहे. यातील सर्वांत मोठा भाग होम आणि अवे सामन्यांचा असणार आहे, त्यामुळे आपल्या पसंतीच्या संघाचा खेळ घरच्या मैदानावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

प्रत्येक आयपीएल नव्या काही बदलांची असते. यंदाची स्पर्धा तर मोठ्या बदल्यांची आहे. ‘इंपॅक्ट खेळाडू’ हा बदल संघांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही उत्सुकतेचा ठरणार आहे.

होम आणि अवे सामने

कोरोनाचे दुष्टचक्र जगावर येईपर्यंत आयपीएलचे सामने होम आणि अवे धर्तीवर होत होते, परंतु गेल्या तीन वर्षांत हे गणित बिघडले होते. यंदा मात्र प्रत्येक संघ आपल्या घरच्या मैदानावर सात सामने खेळणार आहे.

१८ डबल हेडर

५२ दिवसांच्या या कालावधीत १८ दिवस दोन सामने होणार आहेत, शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवशी दोन सामन्यांची मेजवानी मिळणार आहे.

३.३० आणि ७.३० वाजता सामने

सामने उशिरापर्यंत पूर्ण होत नसल्यामुळे तीन वर्षांपासून सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला. यंदाही त्याच वेळा असणार आहेत. दुपारचे सामने ३.३०; तर सायंकाळचे सामने ७.३० वाजता सुरू होतील.

थेट प्रक्षेपण

आयपीएलचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आता आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. रिलायन्सने प्रक्षेपणाच्या शर्यतीत उडी मारून डिजिटल प्रक्षेपणाचे हक्क मिळवले, त्यामुळे आता टीव्हीवर आयपीएल सामने पाहायचे असतील तर ‘स्टार स्पोर्टस’ आणि मोबाईलवर थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी ‘जिओ सिनेमा’ असे पर्याय आहेत.

१० संघ १२ ठिकाणे

गतवर्षापासून दोन नवे संघ तयार झाले, त्यामुळे आयपीएलमधील संघांची संख्या १० झाली. हे १० संघ आपापल्या घरच्या मैदानावर खेळणार असले, तरी अतिरिक्त दोन ठिकाणीही सामने होणार आहेत. राजस्थान रॉयल्स त्यांचे दोन सामने गुवाहाटीमध्ये; तर पंजाब किंग्ज त्यांचे दोन सामने धरमशाला येथे खेळणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com