IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा! हा दिग्गज खेळाडू कर्णधार तर बापुकडेही मोठी जबाबदारी | Cricket news in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023 David Warner to lead Delhi Capitals Axar Patel to be vice-captain

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा! हा दिग्गज खेळाडू कर्णधार तर बापुकडेही मोठी जबाबदारी

Delhi Capitals in IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2023 साठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी डेव्हिड वॉर्नरकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.

त्याचबरोबर अक्षर पटेलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. कार अपघातात अडकल्यामुळे दिल्लीचा नियमित कर्णधार ऋषभ पंत संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. पंत पुढील मोसमात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.

वॉर्नरने यापूर्वी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याने 2016 मध्ये संघाला चॅम्पियन बनवले. 2022 मध्ये तो दिल्ली संघात सामील झाला. त्याला फ्रँचायझीने मेगा लिलावात 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

त्यानंतरच्या मोसमात वॉर्नरने चांगली कामगिरी केली होती. त्याने 12 सामन्यात 48 च्या सरासरीने 432 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 150.52 होता. वॉर्नरच्या बॅटमधून पाच अर्धशतके झळकली.

वॉर्नर यापूर्वी 2009 ते 2013 पर्यंत दिल्ली फ्रँचायझीचा भाग होता. तेव्हा संघाचे नाव होते दिल्ली डेअरडेव्हिल्स. दुसरीकडे अक्षर पटेलबद्दल सांगायचे तर 2019 मध्ये दिल्लीने त्याचा संघात समावेश केला होता.

तो फ्रँचायझीचा महत्त्वाचा सदस्य आहे. त्याने चेंडू आणि बॅटने प्रभावी कामगिरी केली आहे. आयपीएलच्या आगामी मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघ 1 एप्रिल रोजी लखनौ येथे लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

सध्या दुखापतग्रस्त ऋषभ पंतच्या जागी दिल्ली संघात कोणत्याही खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. पंत हा दिल्ली संघाचा भाग आहे, मात्र दुखापतीमुळे तो या मोसमात खेळू शकणार नाही.

दिल्ली संघ - डेव्हिड वॉर्नर, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, मनीष पांडे, फिलिप सॉल्ट, रायली रुसो, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, एनरिच नॉर्टजे, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी , खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मुकेश कुमार.